Ashes 2025 : दुसऱ्या अॅशेस कसोटीपूर्वी इंग्लंडला मोठा धक्का, स्टार खेळाडू बाहेर ?
Ashes 2025 : अॅशेस 2025 मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसात इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव करत जिंकल्यानंतर आता
Ashes 2025 : अॅशेस 2025 मालिकेतील पहिला कसोटी सामना ऑस्ट्रेलियाने अवघ्या दोन दिवसात इंग्लंडचा 8 विकेट्सने पराभव करत जिंकल्यानंतर आता इंग्लंडला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, ब्रिस्बेनमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी इंग्लंडचा स्टार गोलंदाज मार्क वूड बाहेर पडला आहे.
अॅशेस 2025 (Ashes 2025) मालिकेतील दुसरा कसोटी सामना डे-नाईट टेस्ट (AusvsEng) असणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी वूडच्या गुडघ्याचा त्रास पुन्हा समोर आल्याने तो या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. अॅशेस 2025 मालिकेसाठी नऊ महिन्यांच्या दुखापतीनंतर मार्क वूड (Mark Wood) संघात परतला होता मात्र या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात त्याने जास्त गोलंदाजी केली नाही. त्याने पहिल्या डावात आठ षटके आणि दुसऱ्या डावात तीन षटके टाकली, 23 धावा दिल्या. त्याला एकही विकेट मिळाली नाही. आता, अहवालांनुसार, 35 वर्षीय खेळाडूला दुखापतीमुळे पुन्हा बाहेर पडला आहे.
मार्क वूड ब्रिस्बेनमधील संघाच्या पहिल्या प्रशिक्षण सत्राचा भाग नव्हता. तथापि, चार दिवस बाकी आहेत. हा एक लांब दौरा आहे आणि इंग्लंडला त्याच्यासोबत सावधगिरी बाळगायची आहे. या प्रशिक्षण सत्रादरम्यान वूडला टीम हॉटेलमध्ये विश्रांती घेण्यास सांगण्यात आले होते, तर इतर खेळाडू अॅलन बोर्डेन फील्डमध्ये सराव करत होते.
A big blow for England ahead of the second #Ashes Test 🚨
MORE: https://t.co/P1kRMZqPMx pic.twitter.com/VExyFtYYb0
— Fox Cricket (@FoxCricket) November 29, 2025
मार्क वूडची जागा कोण घेणार?
जर मार्क वूड इंग्लंड संघातून बाहेर पडला तर जोश टँग त्याची जागा घेऊ शकतो. टँग सध्या ऑस्ट्रेलियाच्या पीएम इलेव्हनविरुद्ध डे-नाईट पिंक बॉल सामना खेळणाऱ्या इंग्लंड लायन्स संघाचा भाग आहे. जोश टँग व्यतिरिक्त, मॅथ्यू पॉट्स देखील वूडची जागा घेऊ शकतात.
