तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार; कुणाला मिळणार संधी?

तारीख ठरली! ‘या’ दिवशी होणार मंत्रिमंडळ विस्तार; कुणाला मिळणार संधी?

Maharashtra Cabinet Expansion:  राज्यात लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) भाजपसह (BJP) महायुतीला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आतापासूनच महायुतीकडून (Mahayuti) आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) जोरदार तयारी सुरु झाली आहे. यातच एक मोठी बातमी समोर आली आहे.

या बातमीनुसार राज्य मंत्रिमंडळ विस्तार पुढील आठवड्यात होणार आहे. माहितीनुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यासोबत दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री यांच्या वर्षा या निवासस्थानी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत रात्री उशिरापर्यंत चर्चा केली आहे. यामुळे आता पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आगामी  विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मंत्री मंडळाचा विस्तार पावसाळी अधिवेशनापूर्वी करण्यात यावा अशी मागणी महायुतीच्या आमदारांकडून करण्यात येत असल्याची माहिती समोर आली आहे. आमदारांची ही मागणी लक्षात घेत पावसाळी अधिवेशनापूर्वी 27 जून रोजी मंत्री मंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत 07 जागांवर विजय मिळवलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अजित पवार (Ajit Pawar) गटापेक्षा जास्त  मंत्रिपद मिळणार असल्याची देखील चर्चा सुरु झाली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला (NCP) फक्त एक जागा जिंकता आली होती त्यानंतर महायुतीमध्ये मतभेद असल्याची देखील माहिती समोर आली आहे.

पुढील आठवड्यात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे मात्र मिळालेल्या माहितीनुसार यावेळी शिंदे गटातून संजय शिरसाट, आशिष जैस्वाल, यामिनी जाधव आणि भरत गोगावले यांना संधी मिळू शकते तर अजित पवार गटातून संग्राम जगताप, अइंद्रनील नाईक आणि अण्णा बनसोडे यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे.

रील बनवणं जीवावर बेतलं; कार चालवताना रेसवर पडला पाय, 500 मीटर दरीत कोसळून मृत्यू

तर भाजपकडून नितेश राणे, संजय कुटे, राणाजगजित सिंह पाटील, देवयानी फरांदे, मनीषा चौधरी, माधुरी मिसाळ यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात येणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज