राजस्थानच्या चाणक्याला महाराष्ट्राची जबाबदारी; विधानसभेसाठी भाजपकडून राज्यात मोठे फेरबदल

राजस्थानच्या चाणक्याला महाराष्ट्राची जबाबदारी; विधानसभेसाठी भाजपकडून राज्यात मोठे फेरबदल

Bhupendra Yadav appointed as in-charge of Maharashtra : आगामी विधानसभा निवडणुकीची (Assembly elections) जोरदार तयारी आता भाजपने सुरू केली आहे. भाजपने (BJP) आज चार राज्यांच्या निवडणूक प्रभारींची यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्राच्या प्रभारीपदी भूपेंद्र यादव (Bhupendra Yadav) यांची नियुक्ती केली आहे. तर अश्विनी वैष्णव यांची सहप्रभारीपदी नियुक्ती केली. याशिवाय, हरियाणा, झारखंड आणि जम्मू-काश्मिर या राज्यांच्या प्रभारीपदी भाजपने नियुक्ती केली.

Government Schemes : शेत जमिनीवर फळझाड लागवड कार्यक्रम योजनेचा लाभ कोणाला घेता येईल? 

लोकसभेमध्ये महाराष्ट्रात झालेल्या पराभवानंतर भाजपकडून मोठे संघटनात्मक फेरबदल केले जाणार असल्याचे संकेत मिळाले होते. त्यानुसार आता भाजपने राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्या आदेशान्वये आगामी विधानसभा निवडणुकांसाठी चार राज्यात प्रभारींची नव्याने नियुक्ती केली. भाजपने धर्मेंद्र प्रधान यांना हरियाणाच्या प्रभारीपदी नियुक्त केलं. तर बिप्लब देव यांना सहप्रभारी बनवण्यात आले आहे.

Ghati Hospital: रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण, डॉक्टरांचं काम बंद आंदोलन 

तर भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव यांना महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक प्रभारी आणि सहप्रभारी बनवण्यात आले आहे. झारखंड विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना निवडणूक प्रभारी तर हिमंता बिस्वा सरमा यांना सहप्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. याशिवाय जी किशन रेड्डी यांना जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे प्रभारी बनवण्यात आले आहे.

कोण आहेत भूपेंद्र यादव ?
भूपेंद्र यादव यांचा जन्म 30 जून 1969 रोजी राजस्थानमधील अजमेर येथे झाला. अजमेरच्या सरकारी महाविद्यालयातून त्यांनी पदवीचं शिक्षण घेतलं. त्यानंतर कायद्याची पदवी मिळवली. राजकीय कारकीर्द सुरू करण्यापूर्वी ते काही काळ सर्वोच्च न्यायालयात वकील होते. यादव यांची 2010 मध्ये तत्कालीन राष्ट्रीय पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांनी भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय सचिव म्हणून नियुक्ती केली होती. यंदा भूपेंद्र यादव यांनी पहिल्यांदाच राजस्थानमधून लोकसभा निवडणूक लढवली आणि जिंकली.

सचिन पायलट यांच्या निकवर्टीयाचा केला पराभव
भूपेंद्र यादव सलग दोन वेळा राज्यसभेतून खासदार म्हणून निवडून आले, पण पहिल्यांदाच त्यांनी राजस्थानच्या अलवर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी सचिन पायलटच्या निकटवर्तीय ललित यादव यांचा ४८,३३४ मतांनी पराभव केला होता.

या यशामुळे भूपेंद्र यादव हे मोदींच्या नव्या मंत्रिमंडळातील दुसऱ्यांदा केंद्रीय मंत्री बनले. यापूर्वी गेल्या टर्ममध्ये भूपेंद्र यादव राज्यसभेतून निवडून आले होते आणि त्यानंतर त्यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. पंतप्रधान मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील यादव यांची ही दुसरी टर्म आहे. आता त्यांना महाराष्ट्राच्या प्रभारीपदी नियुक्त केलं.

दरम्यान, शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पक्ष फोडल्याच्या आरोपामुळं भाजपची डागाळलेली प्रतिमा, भाजपमधील अंतर्गत कलह अशा अनेक आघाड्यांवर यादव यांना काम करण्याचं आव्हान आहे.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज