ओरिजनल क्लायमॅक्ससह ‘या’ दिवशी 1500 स्क्रीनवर रि- रिलीज होणार शोले
Sholay Re-Released : बॉलिवूड इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित आणि सुपरहिट चित्रपट शोले पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. यंदा शोले ओरिजनल क्लायमॅक्ससह
Sholay Re-Released : बॉलिवूड इतिहासातील सर्वात प्रतिष्ठित आणि सुपरहिट चित्रपट शोले पुन्हा एकदा रिलीज होणार आहे. यंदा शोले ओरिजनल क्लायमॅक्ससह रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाच्या रि- रिलीजवर काम करणारी कंपनी हेरिटेज फाउंडेशनने शोलेला 4K मध्ये तयार केले असून “शोले द फायनल कट” असं या चित्रपटाला नाव देण्यात आले आहे.
रमेश सिप्पी (Ramesh Sippy) दिग्दर्शित शोले 12 डिसेंबर 2025 रोजी देशातील तब्बल 1500 स्क्रीनवर (Sholay Re-Released) रि-रिलीज करण्यात येणार आहे. आतापर्यंत या चित्रपटाच्या ओरिजनल क्लायमॅक्सची अनेक वेळा चर्चा झाली आहे मात्र आता तो क्लायमॅक्स प्रेक्षकांना पाहता येणार आहे. ज्यामुळे बरीच उत्सुकता निर्माण झाली आहे.
अहिल्यानगरमध्ये वनविभागाची मोठी कारवाई, ‘त्या’ नरभक्षक बिबट्याला ठार मारण्यात अखेर यश
मूळ क्लायमॅक्स काय होता?
फिल्म हेरिटेज फाउंडेशनने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर ही माहिती शेअर केली. फिल्म हेरिटेज फाउंडेशनने “शोले” चे 4K रिस्टोअरिंग पूर्ण केले. मूळ क्लायमॅक्समध्ये, ठाकूर गब्बर सिंगला पायांनी चिरडून मारतो. मात्र तेव्हा सेन्सॉर बोर्डाने रिलीज होण्यापूर्वी क्लायमॅक्समध्ये बदल केला.
View this post on Instagram
50 वर्षांनंतर मूळ क्लायमॅक्ससह चित्रपट प्रदर्शित करणे ही टीमसाठी एक उल्लेखनीय कामगिरी आहे. 1975 मध्ये प्रदर्शित झालेला रमेश सिप्पी यांचा “शोले” हा चित्रपट अजूनही भारतीय चित्रपटसृष्टीतील महान चित्रपटांपैकी एक मानला जातो. अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, हेमा मालिनी, अमजद खान, संजीव कुमार आणि इतर कलाकार या चित्रपटाचा भाग होते.
काँग्रेस अध्यक्ष खरगेंना मोठा दिलासा, ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाने याचिका फेटाळली
