Sholay चित्रपटाला सलाम करण्यासाठी येतोय ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’

Sholay चित्रपटाला सलाम करण्यासाठी येतोय ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’

Sholay : हिंदी चित्रपटाच्या इतिहासात ‘शोले’ ( Sholay) हा चित्रपट फार महत्त्वपूर्ण आहे. या चित्रपटानं लोकप्रियतेचे मापदंड बदलले, अनेक कलाकारांचं करिअर घडवलं. शोले हा चित्रपट आजही प्रचंड लोकप्रिय आहे. म्हणूनच ‘शोले’ या चित्रपटाच्या महानतेला ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ ( hajarvela sholay pahilela manus ) या मराठी चित्रपटातून सलाम केला जाणार आहे. या चित्रपटाचं टीजर पोस्टर नुकतंच सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आलं. नुकतेच मुंबई फेस्टिवल येथे या चित्रपटाचे स्पेशल स्क्रीनिंग करण्यात आले होते.

रोहित पवारांची ईडी चौकशी : शरद पवार शक्तीप्रदर्शनाच्या तयारीत; भाजपला देणार ‘खास’ मेसेज

राजेश डेम्पो, भक्ती डेम्पो, सगूण वाघ, श्रीदेवी शेट्टी वाघ यांनी “हजारवेळा शोले पाहिलेला माणूस” या चित्रपटाची निर्मिती केली आहे. शोले मीडिया अँड एंटरटेन्मेंट, कुबेरन्स टेक व्हेंचर्स चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर जीत वाघ असोसिएट प्रोड्यूसर आहेत. चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन हृषिकेश गुप्ते यांनी केलं आहे. अभिनेते दिलीप प्रभावळकर, अभिनेता सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, प्राजक्ता दातार, मिलिंद शिंदे, किशोर कदम बालकलाकार श्रीरंग महाजन अशी दमदार स्टारकास्ट असून अभिनेते आनंद इंगळे,समीर धर्माधिकारी हे पाहुण्या कलाकारच्या भूमिकेतुन आपल्या भेटीस येणार आहेत.

Manushi Chhillar: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये मानुषी छिल्लर दिसणार खिलाडीसोबत?

‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ या चित्रपटाच्या नावातूनच ‘शोले’ या गाजलेल्या चित्रपटाशी कथेचा काहीतरी संबंध आहे हे स्पष्ट होतं, पण चित्रपटाच्या नावामुळेच त्याच्या कथानकाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. शोले चित्रपटाचं थरारक कथानक, त्यातील कलाकारांच्या दमदार अभिनयामुळे व्यक्तिरेखा अजरामर झाल्या. त्यामुळेच ‘शोले’ चित्रपट आजही अविस्मरणीय आहे. ‘शोले’ चित्रपटाच्या याच आठवणींना ‘हजारवेळा शोले पाहिलेला माणूस’ हा चित्रपट सलाम करणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube