Manushi Chhillar: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये मानुषी छिल्लर दिसणार खिलाडीसोबत?

Manushi Chhillar: ‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये मानुषी छिल्लर दिसणार खिलाडीसोबत?

Manushi Chhillar : मानुषी छिल्लर (Manushi Chhillar ), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि टायगर श्रॉफ (Tiger Shroff) स्टारर “बडे मिया छोटे मियाँ” (Bade Mia Chhote Miyan Movie) या वर्षीच्या एप्रिलमध्ये ईदला प्रदर्शित होणाऱ्या मोठ्या चित्रपटा पैकी एक चित्रपट आहे. आता या चित्रपटात मिस वर्ल्ड मानुषी सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 24 जानेवारीला या चित्रपटाचा टीझर लॉन्च होणार असून या बड्या कलाकारांसोबत आता मानुषी सुद्धा आपल्याला मोठ्या पद्यावर लवकरच दिसणार आहे.

मानुषी चिल्लर सध्या सगळ्या कलाकारांसह जॉर्डनमध्ये शूट करत असून 2 फेब्रुवारीपर्यंत तीन गाण्याच्या शूट साठी चित्रपटाची सगळी टीम काम करत असल्याचं कळतंय.अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात ती नेमकी काय भूमिका साकारणार आहे हे निर्मात्यांनी अद्याप सांगितलं नाही तरीही सूत्रां च्या माहिती नुसार या चित्रपटात हॅकरची भूमिका करणार असल्याचं कळतंय. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

“बडे मियाँ छोटे मियाँ ” मध्ये अक्षय कुमारसोबत तिचं काम हे तिच्या कामाची अनोखी बाजू दाखवणार आहे. मानुषी 16 फेब्रुवारी रोजी रिलीज होणाऱ्या तेलगू स्टार वरुण तेज सोबत तिचा द्विभाषिक चित्रपट “ऑपरेशन व्हॅलेंटाईन” मध्ये सुद्धा मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Article 370 Teaser: ‘आर्टिकल 370’ चा टिझर रिलीज, यामी गुप्तहेर अधिकाऱ्याच्या भूमिकेत

100 सेकंदांहून जास्त यात व्हिज्युअल ट्रीट असणार असून उच्च-ऑक्टेन अॅक्शन सीक्वेन्सचे कॅरेक्टर बिल्ड अप बघायला मिळणार आहेत. जशी टीझर लॉन्च जळव येत आहे तसा “टायगर इफेक्ट” बघायला मिळणार आहे. टायगर या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे.”बडे मियाँ आणि छोटे मियाँ” च्या पलीकडे टायगर श्रॉफचा सिनेमॅटिक प्रवास रोहित शेट्टीच्या “सिंघम अगेन” आणि रोहित धवन दिग्दर्शित “रॅम्बो” सोबत Marflix Pictures च्या अंतर्गत हा चित्रपट येणार आहे.

सिनेमाचे बजेट 300 कोटी असल्याचे सांगितले जात आहे, बहुतेक बजेट कलाकारांच्या फीवर खर्च केले जाणार आहे. अली अब्बास जफर या सिनेमावर बजेटमधील फक्त 100 कोटी खर्च करणार आहे. बॉलीवूडमध्ये दोन अ‍ॅक्शन हिरोंचे सिनेमा क्वचितच बनतात कारण दोन स्टार्सची फी बजेटच्या सर्व मर्यादा पलीकडे जात आहे. टायगर चा आगामी सिनेमा “बडे मियाँ छोटे मियाँ” चे निर्माते प्रजासत्ताक दिन 2024 च्या शनिवार व रविवार दरम्यान चित्रपटाचा डायनॅमिक ट्रेलर रिलीज करणार आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज