Article 370 Teaser: ‘आर्टिकल 370’ चा टिझर रिलीज, यामी गुप्तहेर अधिकाऱ्याच्या भूमिकेत
Article 370 Teaser Release: यामी गौतमच्या ‘आर्टिकल 370’ (Article 370) या चित्रपटाचा टीझर लॉन्च झाला आहे. (Article 370 Teaser) यामी (Yami) एका गुप्तचर अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार असल्याचे टीझर पाहून कळते. (Social media) हा चित्रपट काश्मीरमधून ‘कलम 370’ (Article 370 Movie) हटवण्याच्या कथेवर आधारित असल्याचेही टीझर पाहून समजत आहे. या सिनेमाचा पोस्टर आणि टीझर रिलीज झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे.
टीझरच्या सुरुवातीला यामी गौतम काश्मीरमध्ये दहशतवादाला धंदा म्हणताना दिसत आहे. ती असेही म्हणते की, देशाच्या निधीचा एक मोठा हिस्सा गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये येत असला तरी येथील परिस्थिती सुधारलेली नाही. कारण भ्रष्ट राजकारणी आणि नोकरशहा यांना असे होऊ द्यायचे नाही. टीझरमध्ये असेही झळकले आहे की, ‘भले PM 10 वेळा PM झाले. तरीही कलम 370 हटवले जाणार नाही.
काश्मीरमधील कलम 370 हटवण्याची कहाणी: शिवाय टीझरमध्ये एक आवाजही येतो, अध्यक्ष महोदय, आज 5 ऑगस्ट 2019 पासून कलम 370 ची सर्व कलमे काश्मीरमध्ये लागू होणार नाहीत. कलम 370 बाबत देशभरात अनेक दशकांपासून सुरू असलेल्या चर्चेभोवती हा चित्रपट विणला गेला असल्याचे यावरून स्पष्ट होते. हा चित्रपट एक राजकीय ड्रामा असणार आहे.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार: हा चित्रपट 23 फेब्रुवारीला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. टीझरमध्ये यामी गौतमशिवाय साऊथची अभिनेत्री प्रियामणीचीही झलक पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांबळे यांनी केले आहे. चित्रपटाच्या निर्मितीची जबाबदारी ज्योती देशपांडे यांनी घेतली आहे. याशिवाय आदित्य धर आणि लोकेश धर हे देखील या चित्रपटाचे निर्माते आहेत. आदित्य धरने यापूर्वी ‘उरी द सर्जिकल स्ट्राइक’चे दिग्दर्शन केले आहे. यामी गौतमही या चित्रपटात पायलटच्या भूमिकेत दिसली होती.