Amitabh Bachchan : ‘…तेव्हा बाळासाहेबांनीच माझा जीव वाचवला’; बच्चनने सांगितलेली ‘ती’ आठवण

Amitabh Bachchan : ‘…तेव्हा बाळासाहेबांनीच माझा जीव वाचवला’; बच्चनने सांगितलेली ‘ती’ आठवण

Amitabh Bachchan Birthday: बॉलीवूडचा महानायक अमिताभ बच्चन(Amitabh Bachchan) 81 वा वाढदिवस साजरा करीत आहे. बच्चन यांच्या वाढदिवसांनिमित्त देशभरातील चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. दरम्यान, स्व. बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या निधनानंतर एका कार्यक्रमात अमिताभ बच्चनने(Amitabh Bachchan) आपली एक आठवण शेअर केली होती. ही आठवण म्हणजे एका चित्रपटाच्या शुटींगच्यावेळी मी जखमी असताना बाळासाहेब ठाकरे यांनी तणावाच्या वातावरणातही वेळेत रुग्णवाहिका पोहोचवल्याने माझा जीव वाचला असल्याचं खुद्द अमिताभ बच्चन यांनी सांगितलं होतं.

Maharashtra Politics : धनुष्यबाण ठाकरेंना परत मिळणार? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

नेमकं काय घडलं होतं?
मुंबईत कुली चित्रपटाचं शुटींग सुरु होतं. त्याचवेळी अमिताब बच्चन यांच्यासह पुनीत इस्सर आणि सहकलकार यांच्यात फाईटींगचा सीन सुरु होता. या सीनसाठी बच्चन आणि कलाकारांच्या टीमकडून रंगीत तालीमही करण्यात आली होती.

रोहित पवार-अजितदादांमध्ये आता घमासान; दसऱ्यानंतर अजित पवारही महाराष्ट्र पिंजून काढणार !

मात्र, शुटींगदरम्यान पुनीत इस्सार यांनी अमिताभच्या पोटात फाईट मारल्याने अमिताभ बच्चन चांगलेच जखमी झाले होते. तेव्हा मुंबईत तणावाची स्थिती होती. ज्या ठिकाणी शुटींग सुरु होतं त्या ठिकाणी रुग्णवाहिका अशा वातावरणात पोहचणं मुश्किल होतं.

Israel Hamas War: युद्धामुळे सोने-चांदी महाग होणार ? शेअर बाजारालाही फटका!

मुंबईत एकीकडे तणावाची परिस्थिती आणि दुसरीकडे शुटिंगच्या ठिकाणी अमिताभ बच्चन जखमी झालेले, त्याचवेळी शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची घटनेची माहिती समजताच त्यांनी स्वत: दखल घेत शुटींगच्या ठिकाणी रुग्णवाहिका पोहोच केली आहे.

Jayant Patil : शरद पवार कसे काम करतात? जयंत पाटलांनी स्पष्टच सांगितलं

शिवसेनेने दखल घेत रुग्णवाहिका पोहोच केल्यानेच मी रुग्णालयात पोहचू शकलो आणि माझा जीव वाचला. ही आठवण अमिताभ बच्चन यांनी सांगितली होती. ज्यावेळी अमिताभ बच्चन ही आठवण सांगत होते, त्यावेळी त्यांचे डोळे पाणावल्याचं पाहायला मिळालं होतं.

Chhagan Bhujbal : ‘चौकशी कसली करता मला माहित नाही’; दमानियांच्या आरोपांवर भुजबळांच स्पष्ट उत्तर

शुटींगदरम्यान, बच्चन रुग्णालयात दाखल झाले तेव्हा मी दोन महिने रुग्णालयात होतो. मी रुग्णालयात उपचारासाठी दाखल असताना सर्वच चाहत्यांकडून माझ्यासाठी देवाकडे प्रार्थना केल्या जात होत्या. काहींनी तर देवाला नवसही केले होते. त्यावेळी चाहत्यांचं प्रेम आणि शिवसेनेमुळे मिळालेली रुग्णाहिकेमुळेच मी वाचलो, असल्याचं अमिताभ बच्चन म्हणाले आहेत.

अमिताभ बच्चन हे कुली सिनेमातील अपघातानंतर दोन महिने रुग्णालयात होते. त्यांना जेव्हा रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला तेव्हा चाहत्यांनी आणि अर्थातच संपूर्ण बच्चन कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. दरम्यान, आज वाढदिवसानिमित्त त्यांची ही आठवण.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube