Maharashtra Politics : धनुष्यबाण ठाकरेंना परत मिळणार? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Maharashtra Politics : धनुष्यबाण ठाकरेंना परत मिळणार? सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या समर्थक आमदारांसह (Maharashtra Politics) बंड करत वेगळी वाट धरली. त्यांच्या या बंडखोरीने शिवसेनेत उभी फूट पडली. शिंदे एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी पक्ष आणि चिन्हावरच दावा ठोकला. या प्रकरणात निवडणूक आयोगात (Election Commission) सुनावणी होऊन पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देण्यात आलं. आयोगाच्या या निर्णयाविरोधात ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेतली. या याचिकेवर आज महत्वपूर्ण सुनावणी पार पडणार आहे. याआधी ठाकरे गटाच्या याचिकेवर 18 सप्टेंबर रोजी सुनावणी पार पडली होती. त्यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणी तीन आठवड्यांनंतर होईल असे सांगितले होते त्यानुसार ही सुनावणी आज होणार आहे.

महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण…शरद पवार गटाचे अजित पवारांना थेट प्रत्युत्तर

विधीमंडळातील आमदारांची संख्या आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीती विजयी झालेल्या शिवसेना उमेदवारांच्या मतांची आकडेवारी ग्राह्य धरली होती. त्यानुसार आयोगाने हा निकाल दिला होता. शिवसेनेच्या विजयी उमेदवारांपैकी 76 टक्के मते शिंदे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना तर 23.5 टक्के मते उद्धव ठाकरे यांच्याबरोबर असलेल्या आमदारांना मिळाली. त्यामुळे मते आणि विधीमंडळातील आमदारांची संख्या पाहता पक्ष आणि चिन्हावर शिंदे गटाचाच अधिकार आहे, असे निवडणूक आयोगाने निकाल देताना म्हटले होते.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube