रोहित पवार-अजितदादांमध्ये आता घमासान; दसऱ्यानंतर अजित पवारही महाराष्ट्र पिंजून काढणार !

  • Written By: Published:
रोहित पवार-अजितदादांमध्ये आता घमासान; दसऱ्यानंतर अजित पवारही महाराष्ट्र पिंजून काढणार !

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यानंतर दोन्ही गटांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप होत आहेत. तसेच राष्ट्रवादी पक्ष व चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. त्यात आमदार रोहित पवार (Rohit Pawar) हे दसऱ्यापासून युवा संघर्ष यात्रा काढणार आहेत. आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे पक्ष बळकटीसाठी राज्याचा दौरा करणार आहेत. दसर्‍याच्या सिमोल्लंघनानंतर अजित पवारांचा हा दौरा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी मुंबईत ही माहिती दिली आहे.

महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांचा पगडा प्रभावीपणे आमच्यावर आहे. ज्या विचारधारेतून सुसंस्कृत महाराष्ट्र घडला तीच विचारधारा घेऊन अनेक वर्षे काम करत आहोत. आज सत्तेत जाऊन शंभर दिवस होत असताना अजित पवार यांनी भावनिक साद घातली आहे, भावनिक पत्र लिहिले आहे. त्या ‘सादेला’ त्या ‘पत्राला’ जनता नक्कीच प्रतिसाद देईल, असा विश्वासही सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्राच्या राजकारणात आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता आहे. तसे असेल तर आम्ही 2019 मध्ये कुठल्या विचाराने शिवसेनेसोबत युती केली त्याचे उत्तर काय आहे. त्यांच्यासोबत युती करत असताना कुठला विचार आम्ही स्वीकारला होता याचे उत्तरही द्यावे, असे थेट आव्हान सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाला दिले आहे.


‘ज्यांनी संघर्ष यात्रा काढली त्यांनीच..,’; सुनिल तटकरेंनी रोहित पवारांच्या यात्रेवर ठेवलं बोट

अजित पवार यांनी आज जे पत्र लिहिले ते स्वयंस्पष्ट आहे. त्यात राजकीय अनिवार्थ त्यांना जो काढायचा असेल तर त्यांना तो काढता येऊ शकतो. आघाडीच्या राजकारणाची अपरिहार्यता ज्यावेळी येत असते त्यावेळी असे घडत असते. कधी स्वप्नातही वाटू शकते का कॉंग्रेसच्या लोकांनी मला सांगावे किंवा उत्तर द्यावे. सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखालील कॉंग्रेस पक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला नुसता पाठिंबा नव्हेच तर त्यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी मदत करू शकतो. सरकारमध्ये सहभागी होऊ शकतो हे कुठल्या राजकीय विचारधारेमध्ये बसते याचे उत्तर दिले तर आमच्या ज्ञानात भर पडेल, असा टोलाही सुनील तटकरे यांनी लगावला.

Prajakt Tanpure : आरोग्यमंत्र्यांना लाज वाटत असेल तर राजीनामा द्यावा, आमदार तनपुरे संतापले
आम्ही लोकशाहीच्या माध्यमातून भूमिका स्वीकारली. आमचा पक्ष हा लोकशाही मानणारा आहे. 1999 साली छगन भुजबळ यांची निवड होत असताना पक्षातंर्गत आमदारांमधून निवडणूक झाली. 2004 मध्ये आर.आर. पाटील हेसुद्धा पक्षातंर्गत निवडणूकीतून अध्यक्ष झाले. यावेळी पक्षातील 90 टक्के आमदारांना सत्तेत सहभागी व्हावे असे वाटले. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांनी वेगळी भूमिका घेतली आणि मित्र पक्षाचे सरकार येईल अशी राजकीय परिस्थिती निर्माण झाली. त्यावेळी आज शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाने जणूकाही तेच राजकीयदृष्ट्या जन्माला आले असा दावा करणाऱ्या मंडळींनीसुध्दा भाजप सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी जे पत्र लिहिले होते त्या पत्रावर त्या आमदारांच्या सह्या असल्याचे तटकरे यांनी म्हटले.

मागितला नसताना भाजपला बाहेरून पाठिंबा दिला

2024 च्या निवडणुकीनंतरसुध्दा भाजपने पाठिंबा मागितला नसताना आम्ही बाहेरून पाठिंबा दिला होता. ही वस्तुस्थिती खरी आहे त्यामुळे ज्यांनी ट्वीटच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या असतील तर त्यांनी केलेल्या ट्विटवर अधिक माहिती सांगितली, तर महाराष्ट्राच्या राजकारणात चांगला प्रकाश पडेल, असा खोचक टोलाही सुनील तटकरे यांनी लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube