सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल; शोलेचा डायलॉग म्हणत उद्धव यांचा निवडणूक आयोगासह सरकारला चिमटा

शोलेचा एक डायलॉग ठाकरेंनी यावेळी म्हटला, दूर गांव गांव में जब बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आ जायेगा. तसंच आता सांगतो, तुम्ही सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल”

Noname

MNS MVA Satyacha Morcha : राज्यातील सर्व विरोधी पक्ष आज मुंबईत निवडणूक आयोगाविरुद्ध मतदार यादीतील घोळ, दुबार नावे आणि मतचोरीच्या आरोपांवरून मोठा मोर्चा काढत आहेत. ‘सत्याचा विराट मोर्चा’ असे या आंदोलनाचे नाव असून, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि इतर विरोधी नेते या मोर्चात सहभागी होणार आहेत. यावेळी उध्दव ठाकरेंनी मोर्चाला संबोधीत करताना निवडणूक आयोग आणि सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. याचवेळी आपला बोगस व्हेरिफिकेशनचा अर्ज दाखल झाल्याचं सांगितलं.

मोर्चाला संबोधीत करताना ठाकरेंनी राज्यातल्या राजकीय पक्षांची संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर प्रथमच एकजूट झाल्याचं म्हचलं आहे. तसंच,ही फक्त विरोधी पक्षांची एकजूट नसून  लोकशाहीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्यां पक्षांची एकजूट आहे. मतचोरी करणारे आज ही ठिणगी बघत आहेत. याच ठिणगीची कधी आग होईल हे समजणारही नाही. तेव्हा तुमच्या बुडालाही आग लागेल. शोलेचा एक डायलॉग ठाकरेंनी यावेळी म्हटला, दूर गांव गांव में जब बच्चा रोता है तो मां कहती है, सोजा नही तो गब्बर आ जायेगा. तसंच आता सांगतो, तुम्ही सावध राहा, नाही तर अॅनाकोंडा येईल” असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सरकारला चिमटा काढला आहे.

“राजनी तर कागदपत्रांचा डोंगरच उभारला आहे. निवडणूक आयोग कोणाचंही ऐकत नाही आणि सत्ताधाऱ्यांची भूक थांबत नाही. आमचा पक्ष चोरला, आमची निशाणीही चोरली. वडीलपण चोरत आहेत. ते कमी की काय म्हणून आता मतदानही चोरी करत आहेत. या मोर्चात सर्व विरोधक आले. मात्र सत्ताधारी आले नाहीत, अशी टीका उद्धव यांनी यावेळी केली आहे.

उध्दव यांनी त्यांच्या नावानं खोटा व्हेरिफिकेशनचा अर्ज करण्यात आल्याचं सांगितलं. गंभीर बाब म्हणजे आपण केलेल्या अर्जाची आपल्यालाच माहिती कशी नाही? असा सवालही केला. ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे’ या नावानं तो अर्ज करण्यात आला. आपल्यासह कुटुंबीयांची नावं यादीतून बाद करण्याचा प्रयत्न करत आहे का? आम्ही सर्व जण पक्ष बाजूला ठेवत तुमच्यासाठी, मराठी माणसासाठी, हिंदूंसाठी एकत्र आलो,’ असं उध्दव ठाकरे म्हणाले.

विरोधकांच्या या सत्याच्या मोर्चात उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार तसेच शरद पवार सहभागी झाले होते. ‘चले जाव भाजपा’ अशा घोषणा देत, तसे फलकही झळकवण्यात आले. सोबतच या मोर्चात भाजापा, मतचोरीविरोधात घोषणा दिल्या गेल्या.

follow us