कोट्यावधींचं सोनं, चांदी अन् हिरे… नारायण राणेंची संपत्ती आहे तरी किती?
Narayan Rane Net Worth: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) हे महायुतीकडून (Mahayuti) रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून (Ratnagiri-Sindhudurg LokSabha) लोकसभा लढवत आहेत. काल त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाख केला. यावेळी राणेंनी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. त्या प्रतिज्ञापत्रानुसार, राणेंकडे 137 कोटींची संपत्ती असल्याची माहिती समोर आली आहे.
Ahmednagar : तीन लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 56 कोटींचे अनुदान वर्ग; विखेंची माहिती
राणे दांम्पत्याची 137 कोटींची संपत्ती आहे. यामध्ये नारायण राणे यांची वैयक्तिक संपत्ती 35 कोटी रुपयांची असून राणे यांच्या पत्नी आणि कुटुंबावर सुमारे 28 कोटी रुपयांचे कर्ज आहे.
प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षात त्यांचे वार्षिक उत्पन्न 49 लाख 53 हजार 207 रुपये आहे. तर त्यांच्या पत्नीचे वार्षिक उत्पन्न 87 लाख 73 हजार 883 रुपये आहे. कौटुंबिक उत्पन्न 15 लाख 7 हजार 380 रुपये आहे. नारायण राणे यांच्याकडे 1 कोटी 76 लाख 96 हजार 536 रुपये किमतीचे 2552.25 ग्रॅम सोने, तर 78 लाख 85 हजार 371 रुपये किमतीचे डायमंड आहेत.
४ हजार कोटींचा घोटाळा केला असता तर आज भाजपमध्ये असतो; शशिकांत शिंदेंचा टोला
नीलम राणे यांच्याकडे 1 कोटी 31 लाख 37 हजार 867 रुपयांचे 1819.90 ग्रॅम वजनाचे सोने आहे. तर 15 लाख 38 हजार 572 रुपये किमतीचे डायमंड आणि 9 लाख 31 हजार 200 रुपये किमतीची चांदी आहे. सोने-चांदी असे करून राणे कुटुंबाकडे 9 कोटी 31 लाख 66 हजार 631 रुपयांचा किमती ऐवज आहे.
राणे यांच्याकडे कणकवलीतील जानवली, पनवेल, वेंगुर्ला, कुडाळ, कणकवली येथे जमिन आहेत, तर कणकवलीत त्यांचा बंगला आहे. ही सगळी स्थावर मालमत्ता 8 कोटी 41 लाख 45 हजार 337 रुपयांची आहे. नीलम राणे यांच्याकडे पनवेल, जानवली, मालवणमध्ये गाळे, पुण्यात ऑफीस, मुंबईत प्लॅट अशी सुमारे 41 कोटी 1 लाख 82 हजार 765 रुपयांची स्थावर मालमत्ता असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. नारायण राणे यांच्याकडे विविध बँकांमध्ये 12 कोटी रुपये डिपॉझिट आहेत. तर नीलम राणेंचे अडीच कोटी रुपये बॅंक डिपॉझिट आहे.