इंडियन पोस्ट खात्यात ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 63 हजार रुपये पगार

इंडियन पोस्ट खात्यात  ‘या’ पदांसाठी भरती सुरू, महिन्याला मिळणार 63 हजार रुपये पगार

India Post Jobs 2024: तुम्ही जर 10 वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय टपाल विभागात (Indian Postal Department)अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हाला भारतीय टपाल विभागात नोकरी करण्याची इच्छा असेल तर ही तुमच्यासाठी उत्तम संधी आहे. भारतीय टपाल विभागाच्या या भरतीअंतर्गत चालक पदे भरली जाणार आहे. दरम्यान, याच भरतीविषयी जाणून घेऊ.

Mithila Palkar : ‘वेब क्विन’ मिथिला पालकरचा सुंदर लूक 

अधिसूचनेनुसार, या भरती मोहिमेअंतर्गत एकूण 27 कार चालकांची भरती केली जाईल. भारतीय टपाल विभागाने या भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे ज्यासाठी उमेदवार ऑफलाइन मोडद्वारे आपला अर्ज दिलेल्या पत्त्यावर पाठवू शकतात. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 14 मे नंतर प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

मोठी बातमी : पत्राचाळ प्रकरणात राऊतांना मोठा धक्का; जवळच्या मित्राची 73.62 कोटींची मालमत्ता जप्त 

अधिसुचनेनुसार, एन. के. रिजनमध्ये 4 पदे, एस. के रिजनमध्ये 8 जागा आणि बी.जी. (मुख्यालय) रिजनमध्ये 15 जागा रिक्त आहेत. या भरती मोहिमेसाठी अर्ज करण्याऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त बोर्डातून 10वी उत्तीर्ण केलेली असावी. शिवाय अर्जदार उमेदवाराकडे जड आणि अवजड वाहने चालविण्याचा वैध ड्रायव्हिंग परवाना असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा
या पदभरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय किमान १८ वर्षे आणि कमाल २७ वर्षे असावे. मागासवर्गीय उमेदवारांना सरकारी नियमानुसार वयात सवलत दिली जाणार आहे.

किती पगार मिळेल?
या पदांवर निवडलेल्या उमेदवारांना 19,900 रुपये ते 63,200 रुपये प्रति महिना पगार मिळू शकतो.

निवड कशी होणार?
अर्ज करणाऱ्या उमेदवारांना थिअरी टेस्ट/ड्रायव्हिंग टेस्ट आणि मोटर मेकॅनिझम टेस्टसाठी हजर राहावं लागेल. यामध्ये यशस्वी होणाऱ्या उमेदवारांची या पदांवर निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवाराला 2 वर्षांचा प्रोबेशन कालावधी पार करावा लागेल.

अधिकृत अधिसूचना – https://www.indiapost.gov.in/VAS/Pages/Recruitment/IP_19042024_MMS_English.pdf

या भरतीसाठी उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा. कारण आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी अवघे काही दिवस उरले आहेत. महत्वाचं म्हणजे, उशीरा आलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, किंवा चुकीची माहिती असलेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

अर्ज पाठवण्यासाठी पत्ता –
अर्ज करतांना उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह आपला अर्ज स्पीड पोस्टने किंवा रजिस्टर पोस्टाने खालील पत्त्यावर पाठववा.
व्यवस्थापक, मेल मोटर सर्व्हिसेस, बंगलोर – 560001

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube