पोस्ट विभागात 1899 पदांसाठी मेगा भरती, बारावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज, 81 हजार रुपये पगार

  • Written By: Published:
पोस्ट विभागात 1899 पदांसाठी मेगा भरती, बारावी उत्तीर्ण उमेदवार करू शकतात अर्ज, 81 हजार रुपये पगार

Indian Postal Department Bharti 2023 : तुम्ही जर 10वी पास असाल आणि सरकारी नोकरीच्या (Govt job) शोधात असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. कारण भारतीय टपाल विभागात अनेक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भारतीय टपाल विभागात 10वी उत्तीर्ण उमेदवारांसाठी 1899 पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. तुम्हाला या नोकरीमध्ये स्वारस्य असल्यास, तुम्हाला इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइट dopsportsrecruitment.cept.gov.in ला भेट देऊन ऑनलाइन अर्ज भरावा लागेल.

प्रसिद्ध अभिनेत्रीने अवघ्या 24 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचं कारण थक्क करणारं 

दहावी ते पदवी उत्तीर्ण उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतात. विशेष म्हणजे या जागांसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. ही भरती प्रक्रिया गुणवत्तेच्या आधारेच केली जाणार आहे.

या पदांवर भरती केली जाणार आहे
भारतीय पोस्टच्या या भरती प्रक्रियेद्वारे, एकूण 1899 पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाईल. ही पदे इंडिया पोस्ट मिनिस्ट्री ऑफ कम्यूनिकेशनद्वारे निघाली आहेत. या 1899 पदांपैकी 598 पदे पोस्ट असिस्टंटसाठी, 585 पदे पोस्टमनसाठी, 570 पदे MTS, 143 पदे शॉर्टनिंग असिस्टंट आणि 3 पदे मेल गार्डसाठी आहेत. ही सर्व पदे क्रीडा कोट्याअंतर्गत सोडण्यात आली आहेत आणि भारत सरकारचे पोस्ट विभाग (DOP) या पदांवर भरती करणार आहे.

BJP CM Face : मुख्यमंत्रिपदाचा तिढा! भाजपाचे पर्यवेक्षक मैदानात तरीही ‘पत्ते’ बंदच

निवड कशी होईल?
या जागांसाठी कोणतीही परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवारांची निवड केवळ गुणवत्तेच्या आधारावर केली जाईल. या पदांसाठी ऑनलाइन अर्ज करताना उमेदवारांना 100 रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच, भरतीसंबंधी अधिक माहिती मिळविण्यासाठी, तुम्हाला इंडिया पोस्टच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. तुम्हाला तेथे अधिक माहिती मिळू शकते.

अधिकृत वेबसाइट – http://www.indiapost.gov.in

पगार –
पोस्टल असिस्टंट- 21, 500 ते 81,000
पोस्टमन, मेलगार्ड – 21,700 ते 69,100
मल्टी टास्किंग स्टाफ – 18,000 ते 56,000

जाहिरात
https://drive.google.com/file/d/1j8Kgg_xRJX4EiZWTVA5C9UwPVT-tiAw9/view

उमेदवारांनी वेळ न दवडता अर्ज करावा. कारण आता या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्यासाठी केवळ दोन दिवस उरले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 9 डिसेंबर 2023 आहे, त्यापूर्वी अर्ज करा. भरती प्रक्रियेसाठी अर्ज करण्याची ही शेवटची संधी आहे. तुम्ही खरोखरच सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर ही उत्तम संधी वाया घालवू नका आणि थेट अर्ज करा.

अर्ज कसा करायचा?
अधिकृत वेबसाइटद्वारे पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ पदांसाठी अर्ज करू शकतात. यासाठी प्रथम वेबसाइटवर जा. यानंतर अॅप्लिकेशन लिंकवर क्लिक करा. त्यानंतर तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी टाकून नोंदणी करा. उर्वरित अर्ज भरा. आवश्यक कागदपत्रे जोडा आणि अर्ज सबमिट करा. फॉर्म भरून झाल्यानंतर फॉर्मची एक प्रत तुमच्याकडे डाऊनलोड करून ठेवा.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube