मोदींकडून पवारांचा ‘भटकती आत्मा’ उल्लेख, महायुतीला पडणार महागात?, अजित पवारांकडून डॅमेज कंट्रोल

मोदींकडून पवारांचा ‘भटकती आत्मा’ उल्लेख, महायुतीला पडणार महागात?, अजित पवारांकडून डॅमेज कंट्रोल

Ajit Pawar On Sharad Pawar : पुण्यातील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांचा नाव न घेता ‘भटकती आत्मा’ असा उल्लेख केला होता. यावरून आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता पंतप्रधान मोदी नेमकं कोणाला उद्देशून म्हणाले याची मला कल्पना नाही, मी त्यांना विचारून तुम्हाला सांगतो अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.

महायुतीच्या उमेदवारांसाठी 29 एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यात जाहीर सभा घेतली होती या सभेत बोलताना त्यांनी शरद पवार यांचा नाव न घेता त्यांचा उल्लेख भटकती आत्मा असा केला होता. यानंतर महाविकास आघाडीकडून मोदींसह अजित पवार यांच्यावर देखील जोरदार टीका करण्यात आली होती. तर आता या प्रकरणात माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी देखील सावध प्रतिक्रिया देत डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.

अजित पवार म्हणाले, मोदींनी केलेल्या त्या विधानाबद्दल मला माहिती नाही. मी त्या सभेत नव्हतो, त्यामुळे ते कोणाला उद्देशून बोलले याची मला कल्पना नाही, पुढच्या सभेत मोदी आणि माझी भेट होईल. तेव्हा त्यांना मी विचारेन की तुम्ही भटकती आत्मा कोणाला म्हणाला होतात असं अजित पवार म्हणाले.

माझा आत्मा शेतकऱ्यांसाठी अस्वस्थ होतो, असं उत्तर शरद पवार यांनी मोदींनी केलेल्या टिकेला दिला. याबाबत देखील अजित पवारांना प्रश्न विचारण्यात आले मात्र यावर देखील अजित पवार यांनी सावध प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, त्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे, मी आता वेगळा मार्ग निवडला असून एकेकाळी मी त्यांना दैवत मानत होतो. ते वडिलधारे आहेत. त्यांच्या विधानावर मी बोलावं तितका मी मोठा नाही. असं अजित पवार म्हणाले.

तर दुसरीकडे माध्यमांशी बोलताना पुन्हा एकदा अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीका केली . पुण्यात झालेल्या सभेत माझे अवगुण कळायला 17  वर्षे लागली का ? असा सवाल सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना विचारला होता यावर उत्तर देत अजित पवार म्हणाले, आमच्या डोक्यात प्रकाश पडायला 17 वर्षे लागली. काय म्हणणं आहे तुझं असा प्रतिप्रश्न अजित पवारांनी केला.

भाजपने दावा सोडला, नाशिकच्या जागेबद्दल मुख्यमंत्री घेणार निर्णय; चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा

तर कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार पवारांच्या आई सुनंदा पवारांनी काही दिवसापूर्वी बारामतीत धनशक्तीचा वापर सुरू असल्याचा आरोप केला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले, ‘कोणी काय बोलावं ते त्यांच्याकडे. मी त्यांना उत्तर देण्यास बांधील नाही. आमच्या योग्यतेच्या माणसांनी विचारलं असेल तरच मी बोलेन, असं अजित पवार माध्यमांशी बोलताना म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube