शरद पवारही कुटुंबाच्या विरोधात गेले होते! अजित पवारांनी उलगडला ‘तो’ इतिहास

शरद पवारही कुटुंबाच्या विरोधात गेले होते! अजित पवारांनी उलगडला ‘तो’ इतिहास

Ajit Pawar Interview : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर अजित पवार यांनी दावा करत ते भाजपसोबत गेले त्यानंतर खरी चर्चा सुरू झाली. 3 जुलै 2023 रोजी अजित पवारांनी हा निर्णय घेतला आणि त्यांनी उघड भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला ही घडामोड महाराष्ट्राच्या राजकाणाला एक वेगळ वळण देणारी ठरली. त्यानंतर या राजकीय संघर्षाला कौटुंबीक संघर्षाची किनार लाभली. त्याचा परिपाक पाहायचा असेल तर आज सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये होत असलेली बारमती लोकसभेची निवडणूक. या निवडणुकीने अनेक प्रश्नांना आणि चर्चांना तोंड फोडल आहे. (Sharad Pawar) असाच एक नवा आणि माहित नसलेला मोठा खुलासा अजित पवार यांनी आज केला आहे.

 

नव्या बारामतीकरांना या गोष्टी माहित नाहीत

यावेळी अजित पवार म्हणाले, 1962 चा तो काळ असावा. आमच्या कुटुंबातील वसंत दादा पवार हे लोकसभेची पोटनिवडणुक लढवत होते. त्यावेळी आमचं सर्व कुटुंब शेतकरी कामगार पक्षाच्या विचारांचं होतं. त्यामुळे सर्वजन वसंद दादा पवारांचा प्रचार करत होते. परंतु, कुटुंबातील शरद पवार साहेब हे एकमेव व्यक्ती होते जे काँग्रेसचा प्रचार करत होते असा नवा आणि खळबळनक खुलासा अजित पवार यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला आहे. सध्या सर्व पवार कुटुंब राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा प्रचार करत असताना आपण वेगळी भूमिका घेतील आहे या संदर्भाला धरून अजित पवार यांनी वरील घटना सांगितली आहे. तसंच, नव्या बारामतीकरांना या गोष्टी माहित नाहीत असंही अजित पवार म्हणाले.

 

आम्हाला म्हणायचे स्ट्रॅटजी आहे

याच विषयावर बोलताना अजित पवार म्हणाले, अशा घटना किंवा प्रसंग आम्हाला नवीन नाहीत. तसंच, तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या विरोधात गेलात या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, आज आमच्या कुटुंबातील ज्यांचा राजकारणाशी संबंध नाही ते म्हणतात अजित पवार आणि शरद पवार आम्हाला सारखेच आहेत. आमच्या बहिणीही असंच बोलतात. परंतु, कुणी कुणाचा प्रचार करावा हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे असं म्हणत या विषयावर अजित पवारांनी जास्त बोलण टाळलं. तसंच, यावेळी राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यानंतरही शरद पवार यांनी अनेक भूमिका बदलल्या. यावर आम्ही प्रश्न केला तर पवार साहेब म्हणायचे ही राजकीय स्ट्रॅटजी आहे असंही अजित पवार म्हणाले. तसंच, भाजपसोबत बोलणी केली, शिवसेनाला बाजूला केलं अशा वेगवेगळ्या भूमिका घेतल्या यावरही अजित पवार यांनी यावेळी भाष्य केलं.

 

थेट पक्ष विलीन केला

वसंत दादा पाटील, नाशिकराव तिरपुडे यांचं सरकार चांगलं सुरू होत. शेतकऱ्यांसह लोकांचा मोठा पाठिंबा या सरकारला होता. परंतु, शरद पवार यांनी त्यावेळी ही वेगळी भूमिका घेतली. पुलोद सरकार बनवलं. त्यावेळी शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण यांचही ऐकलं नाही असा थेट दावा अजित पवार यांनी यावेळी केला. त्याचबरोबर 1978 ला ही अशीच भूमिका घेतली. 1982, 1985 ला विरोधी पक्षात बसले. त्यानंतर विरोधात बसून काय होईल असा विचार केला आणि ज्या काँग्रेसला विरोध केला त्यामध्ये आपला समाजवादी कांग्रेस पक्ष थेट विलीन करत ते काँग्रेसमध्ये सामिल झाले अशी आठवणही अजित पवारांनी यावेळी सांगितली.

 

चारच महिन्यात काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय

1991 ला शरद पवारांनी पी. व्ही नरसिंहराव यांच्या विरोधात पवारांनी पक्षांतर्गत भूमिका घेतली. पंतप्रधान पदासाठी पवारांनी ही भूमिका घेतली होती. परंतु, पी. व्ही नरसिंहराव पक्षातील ज्येष्ठ नेते असल्याने ते पंतप्रधान झाले. त्यामध्ये शरद पवार संरक्षण मंत्री झाले. त्यानंतरही अनेक गोष्टी घडल्या ज्यामध्ये शरद पवारांनी सोनिया गांधी परदेशी असल्याचा मुद्दा उपस्थित करुन 10 जून 1999 ला राष्ट्रवादी कांग्रेसची स्थापना केली याची आठवण पवारांनी सांगितली. मात्र, त्यानंतर 4 महिन्यातच पवार साहेबांनी काँग्रेससोबत जाण्याचा निर्णय घेतला. आम्हाला सांगितल असं करायच आम्ही करत होतो असंही अजित पवार म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज