अजित पवारांचे भाजपच्या बालेकिल्ल्यात चिंतन शिबीर! शरद पवार, आगामी निवडणुका आणि IPS कॉलवर खुलासे

नागपूरमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) चिंतन शिबीर नागपुरात. यावेळी लेट्सअप मराठीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत खास संवाद साधला.

Ajit Pawar Interview With Letsuup Marathi

NCP Chintan Shibir in Nagpur Ajit Pawar : नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला आहे. नागपूरमध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) चिंतन शिबीर नागपुरात सुरू आहे. यावेळी लेट्सअप मराठीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत खास संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी शरद पवार, आगामी निवडणुका अन् आयपीएस अधिकाऱ्याचा फोन कॉल अशा अनेक विषयांवर भाष्य केलंय.

अजित पवार बोलतोय…

आयपीएस अधिकाऱ्यांच्या व्हायरल क्लिपवर बोलताना अजित पवार यांनी (Ajit Pawar) म्हटलंय की, त्यामध्ये प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. मी त्यासंदर्भात ट्विट केलंय. मला फोन आलेला होता, मी एवढंच म्हटलं की, अजित पवार बोलतोय. परंतु सध्या महाराष्ट्रात वातावरण वेगळं (Maharashtra Politics) आहे. दादा तुमची बातमी असली की, टीआरपी वाढतो, असं मला मिडिया बांधवांनी (NCP Chintan Shibir) सांगितलं.

माझ्यावर जबाबदारी आल्यानंतर

पवार साहेबांसोबत काम करताना ते वडिलाधारे होते. त्यांनी अनेक उन्हाळे-पावसाळे बघितले होते. बराच अनुभव त्यांना होतो. तेव्हा काही झाल्यास पक्षाचे प्रमुख म्हणून ते सगळं सांभाळून घेत होते. माझ्यावर जबाबदारी आल्यानंतर मी सगळं व्यवस्थित बोलण्याचा प्रयत्न करतो. मी अनेक मुख्यमंत्र्‍यांसोबत काम केलेलं असल्यामुळं मला बराच अनुभव आहे, त्यामुळे अडचण येतो. निर्णय घेताना मला राज्याचं हित माहित असतं, कोणताही वैयक्तिक स्वार्थ त्यात नसतो, असं देखील अजित पवार यांना म्हटलंय. शरद पवार यांच्यासोबत काम करत होतो, तेव्हा मार्गदर्शन मिळायचं आता मिळत नाही, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

मद्यविक्री परवान्या संदर्भात

मद्यविक्री परवान्या संदर्भात अजित पवार म्हटले की, हे साफ खोटं आहे. ज्या पदाधिकाऱ्यांना काम करायचं नाही, ते नाराज होतील. मला असे पदाधिकारी नको आहेत. मला जनतेचे प्रश्न समजून घेणारे, ते सोडवणारे काम करणारे पदाधिकारी हवे आहेत. हैद्राबाद गॅझेटवर छगन भुजबळ नाराज आहेत. यावर भुजबळ साहेबांची सूचना आहे की, ज्या जीआरमुळे ओबीसींवर अन्याय होईल, असं वाटतंय. यासाठी बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी स्थापन केल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. मु्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावर स्टेटमंट दिलंय.

निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढणार का? यावर बोलताना अजित पवार यांनी म्हटलंय की, आम्ही निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिघं बसू. नंतर तुम्हाला सांगू. महायुतीत काही कोंडी होत नाही, आपली मतं स्पष्ट असतात, त्यामुळं कोंडी होण्याचा प्रश्न येतंच नाही, असं देखील अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.

 

follow us