मुलीनंतर थेट नातवालाच समोर केलं; मी पुतण्या असलो तरी मुलासारखाच, काय म्हणाले अजित पवार?
Ajit Pawar on Sharad Pawar : लोकसभेला जशी बारामतीची चर्चा झाली तशीच (Ajit Pawar) सध्या बारामतीची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. येथे नणंद-भावजयी नंतर आता काका-पुतण्या अशी लढत होतीयं. अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी ही थेट निवडणूक आहे. दरम्यान, अजित पवारांच सध्याचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे.
मी मुलासारखाच आहे
अजित पवारांनी बारामतीमधील ग्रामस्थांच्या भेटीगाठीवर भर देण्यास सुरुवात केली आहे. लोणी भापकर येथे ग्रामस्थांशी संवाद साधताना अजित पवारांनी काका, शरद पवारांवर टीकास्त्र सोडलं. आपली शेवटची निवडणूक असल्याचं सांगत सुप्रियासाठी मतं मागितली. त्यानंतर आता पुन्हा शेवटची निवडणूक असल्याचे सांगत नातवाला उभं केलं. मी पण पुतण्या आहे, मुलासारखाच आहे असंही अजित पवार म्हणाले आहेत.
बारामतीत किती लीड मिळणार? अजितदादांचं विरोधकांना धडकी भरवणारं उत्तर, म्हणाले, शंभर टक्के
शरद पवारांच्या वयाचा आदर करून सुप्रियाला निवडून दिलं. शरद पवार साहेब म्हणाले मी निवृत्त होणार आहे. वयाने निर्णय घेणार असतील. पण, त्यांच्या पुढचे काम करू शकतं? मी भावनिक करीत नाही. पण शरद पवार 30 वर्ष राज्यात काम केल्यानंतर त्यांनी दिल्लीत काम केलं असल्याचे अजित पवारांनी म्हणाले. मी निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काम करीत नाही. माझी फुशारकी नाही तर काम बोलतं असंही अजित पवारांनी म्हणाले आहेत.
लेकीनंतर थेट नातूच आणला
लोकसभेला पण सांगायचे साहेबांची शेवटची निवडणूक आहे सुप्रिया कडून लक्ष द्या. आता पण सांगतात साहेबांची शेवटची निवडणूक आहे नातवाकडे लक्ष द्या. आता हे अवघडच आहे. मी पण पुतण्या आहे ना? मुलगी झाली की थेट नातूच समोर आणला, मी पण मुलासारखाच आहे ना? असा सवाल अजित पवारांनी केला. त्यांनी पुढे म्हटले की, लोकसभेला जो निर्णय घ्यायचा होता. तुम्ही घेतलात आताची निवडणूक माझ्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. काही प्रमुख नेते आहेत त्याच्यात माझं नाव आहे. नाव व्हायला वेळ लागतो असंही त्यांनी म्हटलं आहे.
सुप्रिया सुळेंचा पलटवार
याबाब खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता, त्या म्हणाल्या कोणता दुष्मण पवार साहेबांची ही शेवटची निवडणूक आहे असं म्हणाला? शरद पवार हे कधीच भावनेचं राजकारण करत नाहीत. त्यामुळे कुणी दुष्मण असला तरी त्याने हजार वर्ष जगाव. एका वर्षात पाच हजार दिवस असावेत असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता अजित पवारांच्या टिकेला जोरदार उत्तर दिलं आहे.