ते अनेक वर्षे सत्तेत होते.., आता मला जास्त खोलात जायला नका लावू, शरद पवारांवर अजित पवारांचा घाव

Ajit Pawar Maratha Reservation Issue on Sharad Pawar : मनोज जरांगे पाटील मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. याबाबत शरद पवार यांनी भाष्य केलंय. (Maratha) 72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे शरद पवार यांनी म्हटले. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नमस्कार! मी उद्धव ठाकरे बोलतोय.., मनोज जरांगे पाटील यांना उद्धव ठाकरे यांचा फोन, काय झाली चर्चा?
शरद पवारांनी अशी सुचना केलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी केंद्र सरकारने नियमात बदल करावा, असा सवाल प्रसारमाध्यमांशी अजित पवारांना केला होता. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जे ही सुचना करतायत ते अनेक वर्षे सत्तेत होते. दहा वर्षे केंद्र सरकारमधे होते. ते पुजनीय आहेत, वंदनीय आहेत. मला जास्त खोलात जायला लाऊ नका असं अजित पवार म्हणाले.
शरद पवार काय म्हणाले होते?
72 टक्के आरक्षण तामिळनाडूमध्ये होऊ शकते. तर घटनेत बदल करता येऊ शकते. घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो, असे शरद पवार यांनी म्हटले. ते अहिल्यानगर येथील एका कार्यक्रमात बोलत होते. यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षांना मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याबाबत आपली भूमिका जाहीर करण्यास सांगितले होते. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. शरद पवार यांनी मराठा आरक्षणाच्या बाजूने भूमिका घेतली आहे. त्यांनी म्हटले की, प्रगतीच्या रस्त्यावर जायचे असेल तर त्याला आरक्षणाच्या मार्गाने जावे लागेल असा एक विचार आहे.
केंद्राच्या पातळीवर धोरणात्मक निर्णय घेण्याचा वेळ आली आहे. शेतकऱ्यांच्या जमिनी दिवसेंदिवस कमी होत चालल्या आहेत. विकासाच्या नावाखाली शेतीच्या जमिनी कमी होत आहेत. तर शेतीवर अवलंबून घटक वाढत आहे. त्यामुळे तांत्रिक बाबींचा विचार करून शेती केली पाहिजे. शेतीत AI चा वापर करायला हवा. रयत शिक्षण संस्थेने यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. या प्रयत्नांना जनतेने देखील सहकार्य करणे गरजेचे आहे, असे शरद पवार यांनी म्हटले.