‘इस्त्रायल धोक्यात येईल’, ‘पुतिन तुम्हाला खाऊन टाकतील’; ट्रम्प अन् हॅरिस यांच्यात घमासान
Presidential Debate 2024 : अमेरिकेत राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीचा ज्वर वाढू (Presidential Debate 2024) लागला आहे. प्रचाराच्या मोहिमेने जोर धरला आहे. रिपब्लीकन उमेदवार डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात (Kamala Harris) पहिल्यांदाच प्रेसिडेन्शियल डिबेट झाली. या डिबेटमध्ये दोन्हीही नेत्यांना एकमेकांवर जोरदार टीका केली. या डिबेटमध्ये कमला हॅरिस यांचं पारडं जड दिसून आलं. कमला हॅरिस विजयी झाल्या तर इस्त्रायलचं अस्तित्वच धोक्यात येईल. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध संपवू असे ट्रम्प म्हणाले तर त्यांना प्रत्युत्तर देत व्लादीमीर पुतिन तु्म्हाला खाऊन टाकतील असा हल्लाबोल कमला हॅरिस यांनी केला.
या डिबेट दरम्यान गाझातील युद्धाचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला. यावर कमला हॅरिस म्हणाल्या मी नेहमी टू स्टेट सॉल्यूशन धोरणावर बोलत असते. यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले (Donald Trump) जर मी राष्ट्रपती असतो तर ही समस्या इतकी वाढलीच नसती. कमला हॅरिस तर इस्त्रायलचा द्वेष करतात असा आरोप ट्रम्प यांनी केला. त्यांच्या या आरोपावर हॅरिस यांनी तिखट शब्दांत प्रत्युत्तर दिलं. ट्रम्प यांनी केलेला दावा चुकीचा आहे. मी इस्त्रायलसोबत आहे. जर त्या काळात ट्रम्प राष्ट्रपती असते तर आतापर्यंत रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन युक्रेनची राजधानी कीव शहरात असते.
पुतिन यांच्या दबावापुढे तु्म्ही केव्हाच शरणागती पत्करली असती. पुतिन कीवमध्ये बसले असते आणि त्यांनी तेथून बाकी युरोपवर नजर ठेवली असती. या मिशनची सुरुवात त्यांनी पोलंडपासून केली असती. एका हुकूमशहा बरोबर मैत्रीचा काय परिणाम होऊ शकतो याची जाणीव तुम्हाला आहे का? असा सवाल करत पुतिन तर दुपारच्या जेवणातच तुम्हाला खाऊन टाकतील असा टोला हॅरिस यांनी ट्रम्प यांना लगावला.
रशियाबरोबरील युद्धात युक्रेनचा विजय (Russia Ukaraine War) व्हावा का असा सवाल ट्रम्प यांना विचारण्यात आला. त्यावर ट्रम्प यांनी सरळ उत्तर देणे टाळले. युद्ध थांबवण्याची आमचीही इच्छा आहे. युद्ध थांबणं हेच (Ukraine War) अमेरिकेच्या हिताचं आहे, असे ट्रम्प या प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले. चर्चेच्या सुरुवातीला दोघांनीही स्मितहास्य करत हस्तांदोलन केले. यानंतर मात्र चर्चेदरम्यान दोघांत तणाव दिसून आला. दोन महिन्यांपूर्वी ज्यावेळी ट्रम्प आणि बायडेन यांच्यात डिबेट झाली होती तेव्हा दोघांनीही हस्तांदोलन करणे टाळले होते.
रशियाच्या कच्च्या तेलाची भारताला किती गरज? युक्रेनला भारताने हिशोबच दिला…