Donald Trump : अमेरिकेत हाय होल्टेज ड्रामा; माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना अटक, 20 मिनीट तुरुंगात
Donald Trump : अमेरिकेत मोठं राजकीय नाट्य घडलं आहे. देशाची माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी अखेर तुरुंगात आत्मसमर्पण केलं आहे. निवडणुकीत धांदली केल्याचा आरोप ट्रम्प यांच्यावर असून आता त्यांना थेट तुरुंगात जावं लागलं आहे. या घटनेने अमेरिकेच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ट्रम्प यांना याच वर्षात चौथ्यांदा अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर चार वेगवेगळे आरोप लावण्यात आले आहे. वकिलांनी 45 पानांचे आरोपपत्र कोर्टात दाखल केले आहे.
Fulton county jail in Georgia releases a mug shot following former President Donald Trump's fourth arrest this year. pic.twitter.com/JwUkA6AwfD
— ANI (@ANI) August 25, 2023
सीएनएच्या रिपोर्टनुसार, ट्रम्प यांनी 2 लाख डॉल बाँड आणि इतर अटी मान्य केल्यानंत त्यांना सोडून देण्यात आले. मात्र, या दरम्यान ट्रम्प जवळपास 20 मिनीटे तुरुंगात होते. या प्रकारानंतर ट्रम्प यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसला आहे. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ट्रम्प यांनी प्रसारमाध्यमांशीही संवाद साधला. मी काहीही चुकीचे केले नाही.
माजी राष्ट्रपती ट्रम्प यांनी निवडणुकीतील हेराफेरी प्रकरणी अटलांटाच्या फुल्टन काउंटी तुरुंगात आत्मसमर्पण केलं. ट्रम्प आत्मसमर्पण करणार असल्यामुळे तुरुंगाबाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ट्रम्प तुरुंगात गेले. मात्र 20 मिनिटांनी बाहेरही आले. त्यानंतर त्यांचा ताफा अटलांटाच्या हर्ट्सफिल्ड जॅक्सन विमानतळाच्या दिशेने रवाना झाला.
कधी विषबाधा, कोण खिडकीतून पडले तर कोणाला गोळ्या घातल्या… गुढरित्या संपले पुतीन यांचे टीकाकार
ट्रम्प यांनी जॉर्जिया येथे निवडणूक निकाल बदलण्यासाठी फसवणूक, धमकी देणे तसेच बनावटगिरी केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात आणखी 18 जणांना आरोपी करण्यात आल आहे. ट्रम्प यांचे चीफ ऑफ मार्क मोडीज यांनी सु्द्धा आत्मसमर्पण केले होते. 15 ऑगस्ट रोजी अटलांटा कोर्टात आरोपपत्र सादर करण्यात आले. आरोपपत्रात 41 आरोपींपैकी 13 आरोपींमध्ये ट्रम्प यांचे नाव आहे.
काय आहे प्रकरण ?
मग शॉटचा सामना करणारे ट्रम्प हे अमेरिकेतील पहिले माजी राष्ट्रपती असतील. अमेरिकेच्या कायद्यानुसार, ज्याच्यावर आरोप आहे, अशा व्यक्तीचा पोलीस फोटो काढतात. त्याला मग शॉट म्हणतात. 2020 मध्ये जॉर्जियात राष्ट्रपती निवडणुकीच निकाल बदलण्याचे षडयंत्र रचल्याचा ट्रम्प यांच्यावर आरोप आहे.