Maratha Reservation : ‘सरकारच्या छाताडावरच बसणार’; जरांगे पाटलांचा सरकारला कडक शब्दांत इशारा

Maratha Reservation : ‘सरकारच्या छाताडावरच बसणार’; जरांगे पाटलांचा सरकारला कडक शब्दांत इशारा

Maratha Reservation : सरकारच्या छाताडावरच बसून आरक्षण घेणार असल्याचा कडक शब्दांत इशाराच मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे. मनोज जरांगे आज अहमदनगरच्या चौंडीत धनगर समाजाच्या मेळाव्यात बोलत होते. यावेळी त्यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.

अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं अस्तित्व शोधणारे ‘अस्तित्व’, भरत जाधव दिसणार एका वेगळ्याच भूमिकेत

मनोज जरांगे म्हणाले, मागील अनेक वर्षांपासून धनगर समाजाचा आरक्षणासाठी लढा सुरु आहे. त्यामुळे आता धनगर समाजाने शांत बसू नये, त्यांनी आरक्षणासाठी लढावं, सरकारच्या छाताडावर बसून आरक्षण घेणार. समाजाशी गद्दारी करणार नसल्याचं मनोज जरांगे म्हणाले आहेत.

World Cup 2023 : अफगाणिस्तानचा आणखी एक उलटफेर; पाकिस्तानला दणका, 8 गडी राखून विजय

मागील काही दिवसांपासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला आहे. जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाचा पवित्रा घेतला होता.

नगर दक्षिण लोकसभा निवडणूक लढवणार का? बाळासाहेब थोरातांनीच दिले उत्तर

अनेक दिवस जरांगे पाटलांनी अन्न आणि पाण्याचा त्याग केल्याचं पाहायला मिळालं. तब्बल 16 दिवस हे आमरण सुरु होतं. अखेर सरकारने काही अटी मान्य केल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर त्यांनी आजपर्यंतची मुदत सरकारला दिली होती.

छत्रपती संभाजीनगरमधून 500 कोटींचं कोकेन जप्त; गुजरात पोलिसांची मोठी कारवाई

मराठा आरक्षणाचा मुद्दा सुरु असतानाच दुसरीकडे राज्यात धनगर आरक्षणाची धग कायमच असल्याचं दिसून आलं आहे. अहमदनगरमधील जामखेडच्या चौंडीमध्ये धनगर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावा, या मागणीसाठी धनगर बांधवांकडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यावेळी धनगर समाजाच्या संघटनांकडूही आमरण उपोषणाचं हत्यार उपसल्याचं दिसून आलं होतं.

दरम्यान, सध्या राज्यात धनगर आणि मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधकांकडूनही राज्य सरकारला चांगलचं धारेवर धरण्यात येत आहे. राज्य सरकारकडून मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी समितीची स्थापना केली असून या समितीच्या माध्यमातून मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. मात्र, अद्याप कोणताही ठोस निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात न आल्याने मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपण आरक्षण छाताडावर बसून घेणार असल्याचं विधान केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज