प्रत्येक वेळी कानफाट फोडलेय, पण निर्लज्जपणाने गाल चोळत…; ठाकरेंनी नार्वेकरांना फटकारले !
Uddhav Thackeray : शिवतीर्थावर झालेल्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांचाही जोरदार समाचार घेतलाय. सर्वोच्च न्यायालयाने प्रत्येक वेळी लवादाचे कानफाट फोडले आहे. परंतु ते निर्लज्जपणाने गाळ चोळत बसले आहेत. अपात्रतेचा निर्णय जेव्हा लावाल तेव्हा लावा. पण सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व राहणार आहे का ? ही लोकशाही टिकणार आहे की नाही ? हे ठरवा. निवडणुका लावा जनता ठरवेल कोण पात्र आणि अपात्र ते असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केले आहेत.
‘…तर महाराष्ट्रात भ्रष्टाचाऱ्यांना मांडीवर घेऊन पप्पी का घेता? संजय राऊतांचा खोचक सवाल
ठाकरे म्हणाले, अपात्रतेचा निर्णय वीस वर्षांनंतर, पन्नास वर्षांनंतर लागेल. देश बघत आहेत. भारतामध्ये सर्वोच्च न्यायालयाला लवाद जपत नाहीत. सर्वोच्च न्यायालयाचे अस्तित्व राहणार का ? बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान अस्तित्वात राहणार आहे. देशाला स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेकांनी त्याग केला आहे. पण आता ही लोकशाही टिकणार की नाही हे लक्षात येत नाही.
Sushma Andhare : …तर नाशिकचा पालकमंत्री काय गोट्या खेळत होता का? अंधारेंचा भुसेंवर पुन्हा हल्लाबोल
ठाकरेंनी सांगितली गोष्ट
अपात्रतेच्या निर्णयाबाबत मेळाव्यात बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी एक गोष्टच सांगितले. एकदा भरल्या कोर्टात न्यायाधीश बसलेले असतात. पुढची केस कोणती आहे असे ते विचारतात. एका वीस वर्षाच्या मुलीचे छेड काढण्याची केस असते. यावरून न्यायाधीश चिडतात. आरोपीच्या पिंजऱ्यात आजोबा काठी टेकत येतात. लाज नाही वाटत का असे न्यायाधीश विचारतात. न्यायाधीश महाराज ही घटना घडली तेव्हा मी पण वीस वर्षांचा होतो. तिची छेड काढली ती आजी झाली आहे. पण तारखेवर तारीख दिली जात आहे, असे ठाकरे म्हणाले. त्यानंतर ते म्हणाले, तीस तारखेला अपात्रतेची तारीख आहे. केसचा निघाल लागण्यापूर्वीच निवडणुका घेऊन दाखवा.