Sushma Andhare : …तर नाशिकचा पालकमंत्री काय गोट्या खेळत होता का? अंधारेंचा भुसेंवर पुन्हा हल्लाबोल

Sushma Andhare : …तर नाशिकचा पालकमंत्री काय गोट्या खेळत होता का? अंधारेंचा भुसेंवर पुन्हा हल्लाबोल

Sushma Andhare : ठाकरे गटाच्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यात त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, महाराष्ट्राचा उडता पंजाब होऊ नये म्हणून आम्ही भूमिका मांडत आहोत. असं म्हणज अंधारे यांनी राज्यातील अमली पदार्थ सापडल्याची आकडेवारी सांगितली. तसेच यावेळी त्या म्हणाल्या की, राज्यातील तरूण पीढी नशेच्या आहारी जात आहे. तर नाशिकमध्ये एवढ्या प्रमाणात जर ड्रग्ज सापडत असेल तर नाशिकचा पालकमंत्री काय गोट्या खेळत होता का? असं म्हणत त्यांनी मंत्री दादा भुसे यांना टोला लगावला आहे.

‘आम्हीच आग आम्हीच भींत, छाटू तुमचे पंख’; अंबादास दानवेंनी शिंदे गटाला ललकारलं

तर पुढे त्या म्हणाल्या की, सत्ताधारी आणि मंत्र्यांवर असे आरोप केले की, ते अब्रुनुकसानिचा दावा करण्याच्या नोटिसा पाठवण्याच्या धमक्या देतात. पण तेच लोक माझ्याशी अंधारातून मांडवली करतात. त्यात त्या म्हणाल्या की, नाशिकचा अमन परदेशी पुण्याच्या नलिनी वायाळला फोन करतो. ती गोगावलेच्या माध्यमातून माझ्या जवळच्या जठारपर्यंत पोहचत धमक्या देते. असं म्हणत नाव न घेता. अंधांरेंनी धमक्या दिल्याचा आरोप भूसेंवर केला आहे.

पराग देसाई मृत्यू : अभिनेता जॉन अब्राहमवर गुन्हा दाखल करण्याची मागणी; नेमकं काय आहे प्रकरण?

त्याचबरोबर यावेळी त्यांनी गृहमंत्री फडणवीसांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, ललित पाटीलला नऊ महिने का ससूनमध्ये ठेवलं? माझ्याकडे माहिती आहे. उघड केली तर खुप दूर जाईल. असं म्हणत त्यांनी यावेळी ललित पाटील प्रकरणी गौप्यस्फोट करण्याची धमकी देखील दिली. पुढे त्या म्हणाल्या राजकारणातील चाणक्य मानल्या जाणारे मला धमक्या देत आहेत.

तसेच फडणवीसांनी कुणालाच घडवलं नाही फक्त जमवलं आहे. त्यांनी फक्त नेत्यांना संपवलं आहे. ज्यामध्ये पंकजा मुंडे, विनोद तावडे, एकनाथ खडसे यांचं नावं घेता येईल. आता तुम्ही चंद्रकांत पाटलांच्या मागे लागले आहेत. तर भाजपची जर सर्वत्र सत्ता आहे. तर देवा भाऊ शिवसेना आणि राष्ट्रवादीतून उचलेगिरी का करता? तसेच मंत्र्यांना जमल नाही म्हणून माझ्यावर अमराठी माणुस टीकेसाठी आणि धमक्यांसाठी पाठवला तो म्हणतो. माझी महुआ मोईत्रा करणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube