राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; ठाकरे, राऊतांना मोठा झटका; न्यायालयाने ‘तो’ अर्ज फेटाळला

राहुल शेवाळे बदनामी प्रकरण; ठाकरे, राऊतांना मोठा झटका; न्यायालयाने ‘तो’ अर्ज फेटाळला

Rahul Shewale defamation case : शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांच्या बदनामी प्रकरणी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह खासदार संजय राऊत यांना माझंगाव न्यायालयाने झटका दिला आहे. राहुल शेवाळे बदनामी प्रकरणी उद्धव ठाकरे, संजय राऊतांकडून दाखल करण्यात आलेला दोषमुक्तीचा अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता या खटल्याला संजय राऊत, उद्धव ठाकरेंना सामोरं जावंच लागणार आहे.

Maratha Reservation: ‘सदावर्तेंना संपवायला हवं होतं; CM शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त विधान

मागील वर्षी शिवसेनेत बंड झाल्यानंतर खासदार राहुल शेवाळे यांनी एकनाथ शिंदे यांच्या गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला होता. शेवाळे शिंदे गटात दाखल होताच ‘सामना’ वृत्तपत्रातून त्यांच्याबद्दल बदनामी करण्यात आल्याचं पाहायला मिळालं होतं.

Maratha Reservation : गाड्या फोडल्यानंतर सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया म्हणाले, ते माझ्या मुलीला आणि पत्नीला…

वृत्तपत्रात राहुल शेवाळेंची पाकिस्तानातही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक असल्याचं प्रसिद्ध करण्यात आलं होतं. मात्र, या आरोपांमध्ये काहीही तथ्त नसून माझी नाहक बदनामी सुरु असल्याचं राहुल शेवाळेंनी स्पष्ट केलं आहे. एवढंच नाहीतर राहुल शेवाळे यांनी सामना वृत्तपत्राचे संपादक संजय राऊत आणि मालक उद्धव ठाकरे यांच्याविरोधात माझंगाव न्यायालयात मानहानीचा दावाही ठोकला होता.

Maratha Reservation साठी शिंदे-फडणवीस दिल्लीला मला विचारून गेले का? म्हणणाऱ्या अजितदादांची सारवासारव

राहुल शेवाळे यांच्या मानहानी प्रकरणी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत या खटल्याला सामोरे जात होते. अशातच आता उद्धव ठाकरेंसह संजय राऊतांनी दोषमुक्तीची याचिका दाखल केली होती. वृत्तपत्रात एक जबाबदार व्यक्ती असते, तीच बातमी प्रसिद्ध केली म्हणून जबाबदार असते त्यासाठी संपादक किंवा मालकाला जबाबदार धरता येणार नाही कारण त्यांचा संबंध नसतो, या आशयाची याचिका दाखल करण्यात आली होती. मात्र, न्यायालयाने हा अर्ज फेटाळून लावला आहे.

‘विरोधात बसून टोमणे मारुन काही होत नाही’; Prafulla Patle यांचा रोहित पवारांना टोमणा

दरम्यान, शिवसेनेत बंड झाल्यानंतर शिंदे गट आणि ठाकरे गटाच्या नेत्यांमध्ये कायमच आरोप-प्रत्यारोपांच्या फेऱ्या आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत असताना हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन आपल्या 40 समर्थकांसह भाजपसोबत हातमिळवणी करीत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिवसेनेत दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं होतं. त्याचदरम्यान, राहुल शेवाळे यांनीही एकनाथ शिंदे गटात दाखल होत समर्थन दिलं होतं.

या प्रकरणी 21 ऑगस्टला उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना 15 हजारांच्या जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला. याआधीही उद्धव ठाकरे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर रहावं लागत होतं. त्यानंतर आता दोषमुक्तीचा अर्ज फेटाळल्यानंतर उद्धव ठाकरेंसह संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ठाकरेंसह राऊतांना या खटल्याला सामोरं जावचं लागणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube