Maratha Reservation: ‘सदावर्तेंना संपवायला हवं होतं; CM शिंदेंच्या आमदाराचं वादग्रस्त विधान
Sanjay Gaikwad Controversial statement: गुणरत्न सदावर्तेंच्या (Gunaratna Sadavarte) गाड्यांची तोडफोड प्रकरणावरून राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. मराठा समाज सध्या आरक्षणावरून (Maratha Reservation Protest) आक्रमक झाला आहे. सदावर्ते यांच्याविरोधात आता शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड प्रतिक्रिया दिली आहे. एकीकडे प्रसिद्ध क्रिमिनल लॉय़र सतीश मानशिंदे यांनी सदावर्तेंची गाडी फोडणाऱ्या आंदोलकांची केस फुकट लढणार असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाडने (Sanjay Gaikwad ) सदावर्तेंबाबत वादग्रस्त विधान केले आहे.
गुणरत्न सदावर्ते यांच्या स्वभावामुळे महाराष्ट्रातल्या गोरगरीब मराठ्यांचे आरक्षण हिसकावल गेलं. यांनी इतक्या प्रखरपणे ती बाजू कोर्टात आरक्षणाविरोधात मांडली, आणि हे गुणरत्न सदावर्ते जसे सूडाने पेटले होते. यांची जी गाडी तोडली ही शिक्षा कमी आहे का? गुणरत्न सदावर्तेंना संपवायला हवं होत, यांना संपवलं असतं तर मराठ्यांचा आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला असता.असे वादग्रस्त विधान संजय गायकवाड यांनी यावेळी केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट केली आहे की, ते शांततेने आंदोलन करणार आहेत. मुख्यमंत्र्यानी दसरा मेळाव्यात लाखो लोकांच्या साक्षीने, शिवरायांच्या समोर शपथ घेऊन सांगितलं की, मी आरक्षण दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. घाईघाईने आरक्षण दिल्यास मोठे नुकसान होणार आहे. प्राण जाये पर वचन ना जाये, अशा प्रवृतीचे मुख्यमंत्री आहेत. सर्वांनी त्यांच्यावर विश्वास ठेवा. असे यावेळी शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी म्हटले आहे.