Maratha Reservation : गाड्या फोडल्यानंतर सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया म्हणाले, ते माझ्या मुलीला आणि पत्नीला…

Maratha Reservation : गाड्या फोडल्यानंतर सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया म्हणाले, ते माझ्या मुलीला आणि पत्नीला…

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन राज्यात पुन्हा वाढत चालले आहे. आता मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड केली. त्यानंतर या घटनेवर संतापलेल्या सदावर्तेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

म्हणाले, ते माझ्या मुलीला आणि पत्नीला…

या घटनेवर संतापलेले सदावर्ते म्हणाले की, हल्लेखोर आणि जरांगेंना माझा सवाल आहे की, तुमच्या शांततेच्या मार्गाने सुरू असलेल्या आंदोलनाची हीच व्याख्या आहे की? पण तुम्ही मला गप्प करू शकत नाही. मी या देशातील 50 टक्के खुल्या जागा वाचवण्यासाठी लढत आहे. देशाला जातिपातीत तोडलं जाऊ शकत नाही. तसेच यावेळी सदावर्ते यांनी जरांगेंच्या अटकेचीही मागणी केली आहे.

फडणवीसांनी शब्द पाळला; दिव्यांग वधूची गैरसोय करणाऱ्या नोंदणी अधिकाऱ्याला सरकारचा दणका

त्याचबरोबर यावेळी सदावर्ते यांनी सांगितले की, माझ्या गाड्या फोडल्याने माझ्या कष्टाच्या कमाईचं नुकसान झालं आहे. यापूर्वी देखील मला धमक्या दिल्या जात होत्या. माझ्या मुलीला आणि पत्नीला देखील उचलून नेण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत. त्यामुळे माझी मुलगी झेन 8 दिवसांपासून शाळेत जात नाही. असा धक्कादायक आरोप त्यांनी यावेळी केला आहे.

Israel Hamas War : अमेरिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाविरोधात मतदान; रशिया-चीनच्या खेळीनं भडकला इस्त्रायल

तर मी जेव्हा एकनाथ शिंदेंना भेटलो तेव्हा त्यांनी माझ्यासमोर पोलिसांना माहिती दिली होती. त्यामुळे पोलिसांना माहिती होती की, माझ्यावर हल्ला होईल म्हणून. पोलिसांनी मला हे सांगितलं होतं की, ते माझ्या घरातही येण्याचा प्रयत्न करतील. तर आता हिंदुराष्ट्र भारतातील सर्वांना सांगायची वेळ आली आहे. की, जातीपाती करून या देशातील विचाराचे आणि गुणवत्तेचे तुकडे केले जाऊ शकतात. ते टाळण्यासाठी मी हा लढा सुरूच ठेवेन. अशी प्रतिक्रिया सदावर्ते यांनी दिली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज