Israel Hamas War : अमेरिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाविरोधात मतदान; रशिया-चीनच्या खेळीनं भडकला इस्त्रायल

Israel Hamas War : अमेरिकेच्या ‘त्या’ प्रस्तावाविरोधात मतदान; रशिया-चीनच्या खेळीनं भडकला इस्त्रायल

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेतील युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन आज अठरा दिवस होत आले आहेत. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. दोन्ही बाजूंनी अविरत बॉम्ब वर्षाव सुरू आहे. हजारो लोकांचा बळी गेला आहे. शहरेच्या शहरे उद्धवस्त झाली आहे. रुग्णालयात औषधे नाहीत. पोटाला अन्न नाही प्यायालाही पाणी नाही अशी भीषण परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. यातच आता राजकारणही सुरू झालं आहे. या युद्धामुळे जगात दोन गट पडल्याचे दिसत आहे. अमेरिकेने इस्त्रायलची (Israel) बाजू घेतल्याने अमेरिकेचे कट्टर विरोधक रशिया (Russia) आणि चीन (China) एकत्र आले आहेत. या दोघांनी अशीच एक खेळी केली आहे. ज्यामुळे इस्त्रायल चांगलाच भडकला आहे.

त्याचं झालं असं, की अमेरिकेने संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत हमासने इस्त्रायलवर केलेल्या हल्ल्यााचा निषेध करणारा प्रस्ताव सादर केला. मात्र, संयुक्त अरब अमिरातीसह रशिया आणि चीन अमेरिकेच्या या प्रस्तावाविरोधात मतदान केलं. या प्रकारानंतर इस्त्रायलचे राजदूत चांगलेच चिडल्याचे पहायला मिळाले. त्यांनी रशिया आणि चीनला फटकार लगावली. तुमच्या देशावर असा हल्ला झाला असता तर तुम्ही यापेक्षा अधिक ताकदीने प्रत्युत्तर दिले असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

Israel Hamas War : ‘मारहाणीत हाडं मोडली’; दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या महिलेना सांगितली ‘आपबीती’

आम्ही इस्त्रायलच्या अस्तित्वासाठी लढत आहोत. तुमच्यापैकी कोणत्याही देशात असं हत्याकांड झालं असतं तर मला खात्री आहे की तुम्ही इस्त्रायलपेक्षा आधिक ताकदीने त्याला प्रत्युत्तर दिलं असतं, असे या राजदूताने म्हटले. अमेरिकेने संयुक्त राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेत जो प्रस्ताव सादर केला होता. त्यात पॅलेस्टिनी संघटना हमासने केलेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात आला होता. या युद्धात ओलीस ठेवण्यात आलेल्या नागरिकांची सुटका करण्याची मागणी या प्रस्तावात करण्यात आली होती. अमेरिकेच्या या प्रस्तावाला दहा देशांनी पाठिंबा दिला. मात्र, संयुक्त अरब अमिरातीसह रशिया आणि चीनने या प्रस्तावाविरोधात मतदान केलं.

भारताने दिला पॅलेस्टाइनला मदतीचा हात…

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सामान्य गाझा आणि पॅलेस्टीनी नागरिकांना मात्र होरपळून काढत आहे. त्या पार्श्वभूमीवर या नागरिकांना माणुसकीचा आधार देणे गरजेचे असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवता वादी संघटनेने पुढाकार घेत पॅलेस्टाइनला मदत केली. त्यानंतर जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला आहे. भारताने यासाठी भारतीय हवाई दलाचे सी-17 हे विमान खास रवाना केले आहे.

Israel Hamas War : ‘गाझा तत्काळ सोडा नाहीतर’.. इस्त्रायलचा पॅलेस्टिनी नागरिकांना इशारा

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube