Israel Hamas War : ‘मारहाणीत हाडं मोडली’; दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या महिलेना सांगितली ‘आपबीती’

Israel Hamas War : ‘मारहाणीत हाडं मोडली’; दहशतवाद्यांच्या तावडीतून सुटलेल्या महिलेना सांगितली ‘आपबीती’

Israel Hamas War : इस्त्रायल आणि हमास दहशतवादी संघटनेतील युद्ध (Israel Hamas War) सुरू होऊन आज अठरा दिवस होत आले आहेत. तरीदेखील युद्धाचा निकाल लागलेला नाही. दोन्ही बाजूंनी अविरत बॉम्ब वर्षाव सुरू आहे.  हजारो लोकांचा बळी गेला आहे. शहरेच्या शहरे उद्धवस्त झाली आहे. रुग्णालयात औषधे नाहीत. पोटाला अन्न नाही प्यायालाही पाणी नाही अशी भीषण परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांच्या तावडीत सापडलेल्या लोकांची स्थिती तर यापेक्षाही वाईट आहे. या ओलिसांना सोडविण्यासाठी इस्त्रायलचे प्रयत्न सुरू आहेत. या ओलिसांच्या बदल्यात हमासकडूनही वाटाघाटी केल्या जात आहेत. हमासने सोमवारी दोन इस्त्रायली महिलांना मुक्त केलं. त्यांच्या प्रकृतीचा विचार करता त्यांना सोडून देण्यात आल्याची माहिती हमासने दिली.

Vladimir Putin : पुतिन एकदम फिट अँड फाईन; हार्टअटॅकच्या केवळ अफवा, क्रेमिनिलचा दावा

नुरिट कूपर (79) आणि योचेवेद लिफशिट्ज (85) अशी या वृद्ध महिलांची नावे आहेत ज्यांना हमासने सोडून दिले आहे. यानंतर लिफशिट्ज यांनी तेथील भयावह अनुभव सांगितला. लिफशिट्ज सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांनी सांगितलं, दहशतवाद्यांनी आमच्या घरावर हल्ला केला. आम्हाला बेदम मारहाण केली. नंतर माझ्या पतीला कैद केले. त्यांना अजूनही दहशतवाद्यांनी सोडलेलं नाही. दहशताद्यांनी मला दुचाकीवर बसवले आणि गाझाला घेऊन गेले.

येथे आल्यानंतर त्यांना माझ्याकडील घड्याळ आणि दागिने काढून घेतले. यानंतर लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. कोण लहान कोण वृद्ध याचा काहीच विचार त्यांच्या डोक्यात नव्हता. त्यांच्या मारहाणीत माझ्या बरगड्या मोडल्या. अशाच अवस्थेत सोडून ते तिथून निघून गेले. माझी अवस्था इतकी वाईट झाली होती की श्वास घेणे सुद्धा शक्य होत नव्हते. त्यानंतर एका खोलीत नेले गेले जिथे आधीच 25 बंधक होते. त्यानंतर मला एका वेगळ्या खोलीत डांबण्यात आले जिथे चार लोक होते, असे लिफशिट्ज म्हणाल्या.

म्हणून त्यांचे मानले आभार 

ज्या खोलीत मला ठेवण्यात आले होते तेथील सुरक्षारक्षकांनी मात्र माझ्याशी चांगला व्यवहार केला. औषधेही दिली. दिवसातून एकदा पनीर, खीरा दिला जात होता. येथे त्यांनी आमची काळजी घेतली. त्यामुळेच येताना मी त्यांचे आभार मानले असे त्यांनी सांगितले. मी जरी घरी आले असले तरी माझे पती मात्र अजूनही त्यांच्या तावडीत आहेत, असे लिफशिट्ज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.

Israel Hamas War : भारताने दिला पॅलेस्टाइनला मदतीचा हात, औषधांसह जीवनावश्यक वस्तू केल्या रवाना

भारताने दिला पॅलेस्टाइनला मदतीचा हात…

इस्त्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सामान्य गाझा आणि पॅलेस्टीनी नागरिकांना मात्र होरपळून काढत आहे. त्या पार्श्वभूमीवर या नागरिकांना माणुसकीचा आधार देणे गरजेचे असल्याचे संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवता वादी संघटनेने पुढाकार घेत पॅलेस्टाइनला मदत केली. त्यानंतर जगभरातील देश पॅलेस्टाइनला मदत करत असताना भारताने देखील पॅलेस्टाइनला मदतीचा हात दिला आहे. भारताने यासाठी भारतीय हवाई दलाचे सी-17 हे विमान खास रवाना केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज