फडणवीसांनी शब्द पाळला; दिव्यांग वधूची गैरसोय करणाऱ्या नोंदणी अधिकाऱ्याला सरकारचा दणका

फडणवीसांनी शब्द पाळला; दिव्यांग वधूची गैरसोय करणाऱ्या नोंदणी अधिकाऱ्याला सरकारचा दणका

मुंबई : दिव्यांग वधू विराली मोदी (Virali Modi) यांना विवाह नोंदणी कार्यालयात झालेल्या मनस्तापाची दखल घेत विवाह नोंदणी अधिकारी अरुण घोडेकर यांना निलंबित करण्यात आले आहे. सोबतच त्यांची रवानगी चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे. निलंबनाच्या कार्यकाळात त्यांना चंद्रपूर मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. राज्य सरकारकडून ही कारवाई करण्यात आली आहे. (Marriage registrar Arun Ghodekar suspended after treatment of disabled bride Virali Modi at marriage registrar office)

नेमके काय आहे प्रकरण?

क्षितिज नायक आणि विराली मोदी हे दाम्पत्य 16 ऑक्टोबर रोजी विवाह नोंदणीसाठी खार परिसरातील मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात गेले होते. नोंदणी कार्यालय दुसऱ्या मजल्यावर होते आणि तिथे लिफ्टही नव्हती. त्यामुळे घोडेकर यांना मदत करण्यासाठी किंवा दुसरी व्यवस्था करण्यासाठी पूर्वकल्पना देण्यात आली होती. मात्र त्यानंतरही विवाहादिवशी विराली यांच्या मदतीसाठी कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही.

‘मराठा आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात पण..,’; शंभूराज देसाईंचं सूचक विधान

शिवाय घोडेकर यांनीही दुसरी कोणती व्यवस्था केली नाही. त्यांनीही विराली यांची स्वाक्षरी घेण्यासाठी खाली येण्यासाठी तयारी दर्शविली नाही. यामुळे दिव्यांग विराली यांना त्यांच्या नातेवाइकांना दोन मजले उलचून न्यावे लागले. याबाबत त्यांनी समाजमाध्यमावर आपबिती मांडली होती. विराला यांचा हा अनुभव वाचून अनेकांना आपला संताप व्यक्त केला. तर अनेकांनी तिच्याविषयी सहानुभूती व्यक्त केली होती.

‘विरोधात बसून टोमणे मारुन काही होत नाही’; Prafulla Patle यांचा रोहित पवारांना टोमणा

काय म्हणाले होते देवेंद्र फडणवीस?

ही पोस्ट व्हायरल होताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली होती. त्यांनी दिलगिरी व्यक्त करत योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. सोशल मीडियावर त्यांनी, सर्वप्रथम नवीन शुभारंभाबद्दल खूप खूप अभिनंदन आणि तुम्हा दोघांना आनंदी आणि सुंदर वैवाहिक जीवनासाठी शुभेच्छा. तसेच तुम्हाला झालेल्या गैरसोयीबद्दल मी खरोखर दिलगीर आहे. मी वैयक्तिकरित्या घेतली दखल असून याबाबत मी सुधारणा करून योग्य कारवाई करीन, असे आश्वासन दिले होते.

फडणवीसांनी शब्द पाळला :

यानंतर आता घोडेकर यांचे निलंबन करण्यात आले आहे. सोबतच त्यांची रवानगी चंद्रपूर जिल्ह्यात करण्यात आली आहे. निलंबनाच्या कार्यकाळात त्यांना चंद्रपूर मुख्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube