Maratha Reservation साठी शिंदे-फडणवीस दिल्लीला मला विचारून गेले का? म्हणणाऱ्या अजितदादांची सारवासारव

Letsupp Image   2023 09 13T115157.260

Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) जरांगेंनी उपोषण सुरु करताच आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र दिल्लीला गेलेले नाही. त्यावर त्यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता. त्यांनी वैतागलेल्या स्वरात उत्तर दिलं. मात्र त्यानंतर त्यावर सारवासारव देखील केली.

शिंदे-फडणवीस दिल्लीला मला विचारून गेले का?

मराठा आरक्षणा संदर्भात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली साठी गेले आहेत. असा प्रश्न पत्रकारांनी अजित पवार यांना विचारला असता, ते मला विचारून गेले का…? असं उत्तरं अजित पवार यांनी दिल. त्यावर सारवासारव करताना मी सकाळपासून या ठिकाणी आहे मला माहीत नाही. माहिती घेऊन सांगतो अस अजित पवार म्हणाले.

राज्यातील तरुणांपेक्षा ठाकरेंना त्यांच्या मुलाच्या भविष्याची चिंता : बावनकुळेंचा टोला

दरम्यान मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यावर मनोज जरांगे यांनी देखील आपली भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे म्हणाले, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीत भाजपच्या हाय कमांड नेत्यांशी सविस्तरपणे चर्चा करणार आहेत. त्यामुळे आता शिंदे-फडणवीसांनी मराठा आरक्षण देण्याचा निर्णयच घेऊन राज्यात यावं, समाज तुमच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचं जरांगेंनी म्हटलं आहे.

‘सुळे-आव्हाडांनी उत्तर द्यावं’; ड्रग्ज तस्करांसोबतचे फोटो दाखवत कायंदेंचं खुलं चॅलेंज

मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केल्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. जरांगे पाटील यांनी आता आरक्षणाचा जीआर घेऊन येत नाही तोपर्यंत शासनातील कोणाशीही संवाद साधणार नसल्याच सांगितलं आहे. सर्वपक्षीय नेत्यांना गावबंदी करत असल्याचही त्यांनी सांगितलं. कोणी नेता आला तर त्याला शांततेत परत पाठवा, कुठेही दंगा करु नका. उग्र आंदोलन, जाळपोळ होणार नाही याची काळजी घ्या. आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नका, असे आवाहन यावेळी त्यांनी मराठा समाजाला केले.

follow us