‘सुळे-आव्हाडांनी उत्तर द्यावं’; ड्रग्ज तस्करांसोबतचे फोटो दाखवत कायंदेंचं खुलं चॅलेंज
Manisha kayande On Supriya Sule : सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाडांचे ड्रग्ज तस्करांशी संबंध, त्यांनी फोटोंबाबत उत्तर द्यावं, असं खुलं चॅलेंज शिंदे गटाच्या नेत्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी दिलं आहे. मागील काही दिवसांपासून राज्यातील ड्रग्ज प्रकरण चांगलच चर्चेत आलं आहे. ड्रग्ज प्रकरणाशी सत्ताधारी नेत्यांचा संबंंध असल्याचा दावा विरोधकांकडून करण्यात आला होता. त्यानंतर आता मनिषा कायंदे यांनी विरोधकांना खुलं चॅलेंजच दिलं आहे.
प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ कोणाला अन् कसा घेता येईल?
मनिषा कायंदे म्हणाल्या, ललित पाटील 2020 पासून शिवसेनेचा कार्यकर्ता. आताही असेलच. अंमली पदार्थ प्रकरणांत अनेकांची नावे समोर आली आहे. यातील मोठं नाव म्हमजे सलमान फाळके, शानू पठाण. ड्रग्सप्रकरणी विरोधकांनी रान उठवायचा प्रयत्न केला. दादा भुसे, शंभूराज देसाई यांच्यावर बेछूट आरोप केले. परंतु, या आरोपांमध्ये कोणतेच धागेदोरे पोलिसांना सापडले नसल्याचं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.
‘बाळासाहेबांचा मतदानाचा अधिकार काढणाऱ्यांनाच डोक्यावर घेता’; CM शिंदेची जळजळीत टीका
तसेच ड्रग्स प्रकरणात अटक झालेली मंडळी कोणाजवळची, कोणाशी संबंधित, कोणाचं प्रोत्साहन, राजकीय पाठबळ? याची चौकशी झाली पाहिजे. या प्रकरणाशी संबंधित काही फोटो दाखवते”, असं म्हणत कायंदे यांनी सलमान फाळके, शानू पठाण यांचे जितेंद्र आव्हाड आणि सुप्रिया सुळेंसोबतचे फोटो दाखवले आहेत.
प्रणिती शिंदेंच सोलापूर लोकसभेच्या उमेदवार! सुशीलकुमार शिंदेंनी दसऱ्यादिवशी केली अधिकृत घोषणा
दरम्यान, फोटो पाहिल्यानंतर सुळे आणि आव्हाडांशी जवळकी दिसतेयं. सुप्रिया सुळे खासदार आहेत. आमच्या सरकारवर त्या रोज उठून आरोप करतात. विश्वप्रवक्ते रोज सकाळी उठून बोलतच असतात. हे फोटो बोलके आहेत. तुम्ही स्वतः काचेच्या घरात राहता तेव्हा दुसऱ्यांच्या घरावर दगडं फेकणं कितपत योग्य आहे. यावर फोटोंबाबत उत्तर द्यावं, याचा खुलासा व्हायला हवा, असंही कायंदे म्हणाल्या आहेत.
Shyamchi Aai: बहुप्रतीक्षित ‘श्यामची आई’ चित्रपटातलं पहिलं गाणं प्रदर्शित
दरम्यान, राज्यात काही दिवसांपासून ड्रग्ज प्रकरणं उघड झाल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमधून ललित पाटीलला अटक केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये ड्रग्ज बनवण्याच्या कारखान्यावर छापेमारी करण्यात आल्याचं दिसून आलं. या प्रकरणी राज्यभरातून अनेक संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहेत.
या प्रकरणावरुन विरोधकांनी चांगलचं रान पेटवलं आहे. विरोधकांकडून ड्रग्ज प्रकरणाचा सत्ताधाऱ्यांशी तर सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांशी संबंध लावण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता मनिषा कायंदे यांनी केलेल्या आरोपांवरुन खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार जितेंद्र आव्हाड काय बोलणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.