PM Modi Shirdi Visit : पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला PM मोदींकडून बूस्टर डोस; ‘शिर्डीत वाचला यशाचा पाढा

PM Modi Shirdi Visit : पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला PM मोदींकडून बूस्टर डोस; ‘शिर्डीत वाचला यशाचा पाढा

PM Modi Shirdi Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)आज शिर्डी (Shirdi)दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी साईंचे दर्शन घेतले आणि निळवंडे धरणासह विविध प्रकल्पांचे लोकार्पण केले. त्यानंतर मोदी सभेच्या ठिकाणी पोहोचले. तेथे त्यांनी प्रचंड अशा जनसमुदायाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी शेतकऱ्याच्या मुद्यावर बोलताना पवारांवर टीका केली तर सहकार क्षेत्रावर बोलताना त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला बूस्टर डोस दिल्याचं पाहायला मिळालं.

पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला बूस्टर डोस…

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील काम करत आहोत. ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून 315 रू प्रति क्विंटल करण्यात आलं आहे. तर गेल्या 9 वर्षांत 70 हजार कोटींचं इथेनॉल खरेदी करण्यात आले आहे. हा पैसा देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावेत.

लातूरमध्ये चार मजली इमारतील भीषण आग, तिघांचा मृत्यू, परिसरात खळबळ

साखर कारखाने आणि सहकारी संस्थांना हजारो कोटींची मदत देण्यात आली आहे. तसेच आम्ही सहकार आंदोलनाला सशक्त करण्याचं काम देखील करत आहे. देशात 2 लाखांहून अधिक सहकारी समित्या तयार करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना विविध सुविधा देण्यासाठी या समित्यांना मदत देण्यात आली आहे. असा पाढा वाचून दाखवतं त्यांनी सहकार क्षेत्र आणि त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला बूस्टर डोस दिल्याचं पाहायला मिळालं.

‘PM मोदी आता ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत’; प्रकाश आंबेडकरांचं मोदींच्या दौऱ्यावर बोट

दरम्यान यावेळी त्यांनी शरद पवारांवर देखील टीका केली. ते म्हणाले की, ‘आम्ही पवित्र भावनेने शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. पण काही लोकांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण केले. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते केंद्रात अनेक वर्ष कृषीमंत्री होते, तसं तर व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शरद पवारांनी (Sharad Pawar) सात वर्षांत त्यांनी साडे तीन लाख कोटींच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले. त्याचवेळी मागच्या सात वर्षांत आमच्या सरकारने एमएसपीवर साडे तेरा लाख रुपयांच्या धान्याची खरेदी केली आहे.’ असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी
लगावला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज