कृषीमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजितदादांसमोरच PM मोदींचा सवाल

कृषीमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजितदादांसमोरच PM मोदींचा सवाल

शिर्डी : “आम्ही पवित्र भावनेने शेतकऱ्यांच्या विकासासाठी प्रयत्न करत आहोत. पण काही लोकांनी महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या नावाने फक्त राजकारण केले. महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेते केंद्रात अनेक वर्ष कृषीमंत्री होते, तसं तर व्यक्तिगत मी त्यांचा आदर करतो, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? शरद पवारांनी (Sharad Pawar) सात वर्षांत त्यांनी साडे तीन लाख कोटींच्या एमएसपीवर धान्य खरेदी केले. त्याचवेळी मागच्या सात वर्षांत आमच्या सरकारने एमएसपीवर साडे तेरा लाख रुपयांच्या धान्याची खरेदी केली आहे, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लगावला. ते शिर्डीमध्ये विविध विकासकामांच्या लोकार्पण कार्यक्रमादरम्यान बोलत होते. विशेष म्हणजे यावेळी व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवारही उपस्थित होते. (PM Narendra Modi ask question to Sharad Pawar on farmers in front of Ajit Pawar)

‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल रत्न होते’ : भाषणाच्या सुरुवातीलाच PM मोदींकडून आदरांजली

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले, 2014 आधी आधी डाळी आणि तेलबियांना फक्त 500 ते 600 रुपये मिळायचे. पण आमच्या सरकारने डाळी आणि तेलबियांचे एक लाख 15 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात दिले. शरद पवार कृषीमंत्री होते तेव्हा शेतकऱ्यांना अडत्यांच्या भरवशावर राहायला लागत होतं. अनेक महिने शेतकऱ्यांना पैसे मिळत नव्हते, पण आमच्या सरकारने थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा केले, शेतकऱ्यांना आता लगेच पैसे मिळतात. याशिवाय राज्यातील साखर उद्योगालाही चालना देत शेतकऱ्यांच्या खिशात जास्तीत जास्त पैसे देण्याचा प्रयत्न केल्याचेही मोदी यांनी सांगितले.

पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला PM मोदींकडून बूस्टर डोस :

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी देखील काम करत आहोत. ऊसाला योग्य भाव मिळावा म्हणून 315 रू प्रति क्विंटल करण्यात आलं आहे. तर गेल्या 9 वर्षांत 70 हजार कोटींचं इथेनॉल खरेदी करण्यात आले आहे. हा पैसा देखील शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यात आलं आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावेत यासाठी साखर कारखाने आणि सहकारी संस्थांना हजारो कोटींची मदत देण्यात आली आहे. तसेच आम्ही सहकार आंदोलनाला सशक्त करण्याचं काम देखील करत आहे. देशात 2 लाखांहून अधिक सहकारी समित्या तयार करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांना विविध सुविधा देण्यासाठी या समित्यांना मदत देण्यात आली आहे. असं म्हणत त्यांनी सहकार क्षेत्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील शुगर लॉबीला बूस्टर डोस दिल्याचं पाहायला मिळालं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज