‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल रत्न होते’ : भाषणाच्या सुरुवातीलाच PM मोदींकडून आदरांजली

‘बाबा महाराज सातारकर देशाचे अनमोल रत्न होते’ : भाषणाच्या सुरुवातीलाच PM मोदींकडून आदरांजली

पुणे : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar)  यांच्या निधनाने अतिव दुःख झाले, ते देशाचे अनमोल रत्न होते, त्यांनी कीर्तन आणि प्रवचन या माध्यमातून जे समाज जागृतीचं काम केलं ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे, अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली. ते शिर्डीमधून विविध विकास कामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते. भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांनी बाबा महाराज सातारकर यांच्याबद्दलच्या आठवणी ताज्या केल्या. (Prime Minister Narendra Modi paid tribute to Baba Maharaj Satarkar.)

पंतप्रधान मोदी म्हणाले, “आज सकाळीच मला देशाचे अनमोल रत्न, वारकरी संप्रदायाचे वैभव, हरिभक्त बाबा महाराज सातारकर यांच्या निधनाचं वृत्त कळले. त्यांनी कीर्तन आणि प्रवचनांच्या माध्यमातून जे समाज जागृतीचं काम केलं ते येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देणारं आहे. बाबा महाराज सातारकर यांच्या बोलण्यातील साधेपणा, त्यांचे बोलण्याची प्रेम, त्यांची शैली लोकांचे मन मोहून टाकायची. त्यांच्या वाणीतून कायमच जय जय रामकृष्ण हरी या भजनाचा प्रभाव आपण सगळ्यांनी पाहिला आहे. मी बाबा महाराज सातारकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो”

कृषीमंत्री असताना शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं? अजितदादांसमोरच PM मोदींचा सवाल

बाबा महाराज सातारकर यांचे निधन :

ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजरपणामुळे ते अंथरुनाला खिळून होते. अखेर आज (26 ऑक्टोबर) त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी तीन वाजल्यापासून नेरुळ जिमखान्यासमोर बाबा महाराज यांनी उभारलेल्या श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या (27 ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता नेरुळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

वारकरी संप्रदायावर शोककळा : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

कोण होते बाबा महाराज सातारकर :

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे यांना वारकरी संप्रदायात बाबा महाराज सातरकर या नावाने ओळखत जात होते. बाबा महाराज यांच्या घराण्याला तब्बल 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. त्यांच्या घराण्याकडे गेल्या 80 ते 100 वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज आणि श्री. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘मानकरी’ ही परंपरा आहे. 1962 साली चुलते आप्पा महाराज यांच्या निधनानंतर ही परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज