वारकरी संप्रदायावर शोककळा : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

वारकरी संप्रदायावर शोककळा : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ किर्तनकार बाबा महाराज सातारकर (Baba Maharaj Satarkar) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. मागील काही दिवसांपासून आजरपणामुळे ते अंथरुनालाच खिळून होते. अखेरीस आज (26 ऑक्टोबर) त्यांची प्राणज्योत मालवली. आज दुपारी तीन वाजता नेरुळ जिमखानासमोर त्यांनी उभारलेल्या श्री. विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर उद्या (27 ऑक्टोबर) सायंकाळी पाच वाजता नेरुळमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. (Veteran kirtanist Baba Maharaj Satarkar passed away)

कोण होते बाबा महाराज सातारकर :

नीळकंठ ज्ञानेश्वर गोरे यांना वारकरी संप्रदायात बाबा महाराज सातरकर या नावाने ओळखत जात होते. 5 फेब्रुवारी 1936 रोजी सातार्‍यात त्यांचा जन्म झाला. इंग्रजी माध्यमातून दहावीपर्यंतचे शिक्षण घेतल्या बाबा महाराज यांनी वकिलीत पदवी घेतली होती. 1960 च्या दशकात काही काळ त्यांनी लाकूड सामानाचाही व्यवसाय केला. मात्र या व्यवसाय आणि उच्च शिक्षणानंतरही ते घरच्या वातावरणामुळे वारकरी संप्रदायाकडे ओढले गेले.

फडणवीसांनी शब्द पाळला; दिव्यांग वधूची गैरसोय करणाऱ्या नोंदणी अधिकाऱ्याला सरकारचा दणका

बाबा महाराज यांच्या घराण्याला तब्बल 135 वर्षांपासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायातील प्रमुख फड म्हणून त्यांच्या सातारकर फडाचे नाव घेतले जात असे. त्यांच्या घराण्याकडे गेल्या 80 ते 100 वर्षांपासून श्री. ज्ञानेश्वर महाराज आणि श्री. तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात ‘मानकरी’ ही परंपरा आहे. 1962 साली चुलते आप्पा महाराज यांच्या निधनानंतर ही परंपरा बाबा महाराजांनी पुढे चालू ठेवली.

बाबा महाराजांचे वडील ज्ञानेश्वर दादा महाराज गोरे हे उत्कृष्ट मृदूंगवादक होते. शिवाय त्यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई ज्ञानेश्वर गोरे यांना संत वाङ्मयाची आवड होती. चुलते आप्पा महाराज आणि अण्णा महाराज यांच्याकडून बाबा महाराज यांनी परमार्थाचे धडे घेतले. ते  आठव्या वर्षांपासून श्री सद्गुरू दादा महाराज यांच्या किर्तनात अभंगांच्या चाली म्हणत. तर 11 व्या वर्षांपासूनच त्यांनी पुरोहितबुवा, आग्रा घराण्याचे लताफत हुसेन खाँ साहेब यांच्याकडे शास्त्रीय गायनाचे धडे घेतले.

Maratha Reservation : गाड्या फोडल्यानंतर सदावर्तेंची संतप्त प्रतिक्रिया म्हणाले, ते माझ्या मुलीला आणि पत्नीला…

बाबा महाराज सातारकर यांनी 1983 पासून दरवर्षी संतांच्या गावी किर्तन सप्ताह आयोजित करण्याची परंपरा सुरू केली होती. याशिवाय त्यांनी सुमारे 15 लाख तरुणांना संप्रदायाची दिक्षा देऊन त्यांना व्यसनमुक्त केले. 1983 साली त्यांनी जनसेवेसाठी श्री. चैतन्य अध्यात्मिक ज्ञान प्रसार संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत दरवर्षी 60 ते 70 हजार भाविकांना विनामूल्य वैद्यकीय सेवा तसेच औषधे पुरविण्यात येतात.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube