‘PM मोदी आता ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत’; प्रकाश आंबेडकरांचं मोदींच्या दौऱ्यावर बोट

‘PM मोदी आता ग्रामपंचायतीचे सरपंच झालेत’; प्रकाश आंबेडकरांचं मोदींच्या दौऱ्यावर बोट

Prakash Ambedkar Speak on Pm Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदी(PM Narendra Modi) सध्या शिर्डी दौऱ्यावर आहेत, शिर्डीतील विविध विकासकामांचं मोदींच्या उद्घाटन झालं. मोदींच्या या शिर्डी दौऱ्यावरुन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांनी बोट ठेवत खरमरीत टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता ग्रामपंचायतीचे सरपंच झाले असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. धुळ्यात आयोजित एल्गार परिषदेआधी आंबेडकरांनी माध्यमांशी संवाद साधला.

विखे पाटलांसाठी फडणवीसांचे लॉबिंग; PM मोदींसमोर केले तोंडभरून कौतुक

आंबेडकर म्हणाले, पंतप्रधान आता ग्रामपंचायतीचे सरपंच झाले म्हटल्यानंतर काय बोलणार. गावात कुठेही काहीही झालं तर उद्घाटन माझ्या हातूनच व्हावे, असं सरपंचास वाटतं तसंच मोदींना देखील वाटू लागले आहे, त्यामुळेच नरेंद्र मोदी हे पंतप्रधान नसून आता सरपंच झाले आहेत, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

Jayant Patil : ‘मोदीजी, फित कापून खुशाल श्रेय घ्या!’ ‘निळवंडे’ची आठवण सांगत जयंत पाटलांचा टोला

भाजप काळात 1 लाख हिंदुंनी देश सोडला :
भाजप जे हिंदुत्ववादी स्वतःला म्हणून घेत आहे, त्यांच्याच काळात मागील एक वर्षात जवळपास 1 लाख 13 हजार हिंदूंनी देश सोडून दुसऱ्या देशाचं नागरिकत्व स्वीकारल आहे. त्यातील एकाने आपलं मनोगत व्यक्त करत भाजप हे आम्हाला आमच्या विचाराने चालू देत नसल्याचे म्हणत भाजपा आम्हाला त्रास देत असल्याने व आमच्या वाड-वडिलांची इज्जत भाजप मातीमध्ये मिळवायला निघाली असल्याने आम्ही देश सोडत आहोत, असे म्हणत हिंदूचं सरकार म्हणावणाऱ्या भाजपामुळे देशातील असंख्य हिंदू हे देश सोडत असल्याचंही आंबेडकर म्हणाले आहेत.

पाणी टंचाईमुळं रब्बी हंगामावर संकट; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

मोदी बापात बाप अन् लेकात…
सध्याचे राजकारण बघतात आता नरेंद्र मोदी बापात बाप ठेवणार नाही आणि लेकात लेक ठेवणार नाहीत.
मंडळ कमिशनर गुजरातची यादी बघा आणि मोदी ओबीसी आहेत का? असा प्रश्न उपस्थित करत प्रकाश आंबेडकरांनी थेट मोदींवरच प्रश्नचिन्हच उपस्थित केले आहेत. आरएसएस आणि मोदी हे दोन्ही खोटारडे असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

नामदेव शास्त्री : भगवान गडावरील 72 वर्षांचा दसरा मेळावा ते पंकजा मुंडेंना आशीर्वाद

दरम्यान, आम्ही महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा लढवण्याच्या तयारीला लागलो असून राज्यातील मतदारसंघात चाचपणी सुरु असल्याचंही प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज