विखे पाटलांसाठी फडणवीसांचे लॉबिंग; PM मोदींसमोर केले तोंडभरून कौतुक

  • Written By: Published:
विखे पाटलांसाठी फडणवीसांचे लॉबिंग; PM मोदींसमोर केले तोंडभरून कौतुक

Devendra Fadnavis speech  in shirdi: ज्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील (Radhakrishna Vikhe) मधुकर पिचड हे नेते विरोधात होते, तेव्हा त्यांनी निळवंडे धरण प्रकल्पाला सहकार्य केलं. त्यामुळंच हा प्रकल्प पूर्ण होऊ शकला, अशा शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विखे पाटलाचं तोंडभरून कौतुक केलं. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Prime Minister Narendra Modi) हस्ते निळवंडे प्रकल्पाचे लोकार्पण आणि अन्य विकासकामाचे उद्घाटन झाले. त्यावेळी फडणवीस बोलत होते.

‘मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे’, चिठ्ठी लिहून 23 वर्षीय तरुणानं संपवलं जीवन 

यावेळी बोलतांना फडणवीस म्हणाले, निळवंडे सारखा मोठा प्रकल्प माझ्या जन्माच्या आधीच आहे. मात्र, आता त्याचं उद्घाटन पंतप्रधान मोदींच्या हस्ते होत आहे. या प्रकल्पाचे लोकार्पण ही जिल्ह्यासाठी आनंदाची बाब आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्यासाठी 46 वर्षाची प्रतीक्षा शेतकऱ्यांना करावी लागली. विरोधात असूनही राधाकृष्ण विखे, मुधकर पिचड यांनी या प्रकल्पासाठी मोलाचं सहकार्य केलं. त्यांच्या सहकार्यामुळेच हा प्रकल्प पूर्ण झाला, असं फडणवीस म्हणाले.

यावेळी मंचावर राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री गिरीश महाजन, खा. भागवत कराड, मंत्री धनंजय मुंडे आदी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, मोदींनी मागील ९ वर्षात सिंचनासाठी ३० हजार करोड रुपये दिले. मोदींच्या प्रेरणेने राज्य सरकार काम करत आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवरच राज्य सरकारने नमो किसान सन्मान निधी योजना आणली. अनेक विकासकामांचं उद्घाटन राज्यात होत आहे. राज्यातील ५० टक्के क्षेत्र हे दुष्काळी आहे. या परिसात जोपर्यंत सिंजनाची सुविधा होणार नाही, तोपर्यंत शेतकरी आत्महत्या थांबणार नाहीत. मात्र, मोदींच्या आशिर्वादामुळं हे राज्य सरकार शेतकरी आत्महत्या थांबवण्याचे प्रयत्न करेल. येत्या काळात शेतकऱ्यांच्या पुढच्या पिढ्या दुष्काळ बघणार नाहीत, असा विश्वास फडणवीसांनी व्यक्त केला.

दरम्यान, मोदींसमोरच फडणवीसांनी विखेचं कौतुक केलं. त्यामुळं विखे पाटील हे भाजपसाठी अनुकलूच असल्याचं फडणवीसांनी अधोरेखित केलं. दरम्यान, फडणवीसांनी केलेल्या कौतुकामुळं आगामी लोकसभा निवडणुकीत खा. सुजय विखे यांना खासदारकीचं तिकीट मिळणार, अशी चर्चा सुरू झाली.

8.32 टीएमसी क्षमतेच्या या प्रकल्पामुळे अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहता तालुक्यातील सुमारे 68 हजार हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज