‘मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे’, चिठ्ठी लिहून 23 वर्षीय तरुणानं संपवलं जीवन
Hingoli News: राज्यात मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक गावांत राजकीय नेत्यांना गावबंदी केली. मात्र, अद्याप मराठा आरक्षणाचा तिढा सुटला नाही. त्यामुळं काही दिवसांपूर्वी सुनील कावळे या तरुणाने मराठा आरक्षणसाठी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा अशीच एक हृदयद्रावक घटना घडली आहे. एका 23 वर्षीय तरुणाने चिठ्ठी लिहून गळफास घेत जीवनयात्रा संपवली आहे. नवनाथ उर्फ कृष्णा कल्याणकर (Navnath Kalyankar) असं मृत तरुणाचं नाव आहे.
ललित पाटीलचा ‘एक्झिट प्लॅन’ यशस्वी करणाऱ्या दोघांना अटक : पुणे पोलिसांची मोठी कारवाई
मिळालेल्या माहितीनुसार, नवनाथ हा हिंगोलीतील देवजना गावचा रहिवासी होता. त्याने बाळापूर आखाडा शिवारात गळफास गेत आपली जीवनयात्रा संपवली आहे. नवनाथ हा आज (दि. २६) रोजी सोयाबीन काढणीसाठी मळणी यंत्र घेऊन शेतात गेला होता. मजुरांना मळणीचे यंत्र सुरू करून दिल्यानंतर त्याने जवळच्या झाडाला गळफास लावून घेतला. चालू असलेल्या मळणी यंत्रामध्ये जास्त प्रमाणात सोयाबीनचा घास अडकल्याने ट्रॅक्टर बंद पडत होते. तेव्हा मजूरांनी नवनाथला आवाज दिला. मात्र, आवाज दिल्यानंतरही नवनाथ आढळून येत नसल्यानं मजूरांनी त्याचा शोध घेतला असता गळपास घेतल्याच्या स्थितीत आढळून आला.
या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी आखाडा बाळापूर स्टेशननचे सहाय्यक पोलीन निरीक्षक सुनील गोपीनवार, उपनिरीक्षक शिवाजी बोंडले यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळी मृतदेहाची तपासणी केली असता, मयत नवनाथ याच्या खिशात चिठ्ठी आढळून आली. मराठा आरक्षणासाठी मी आत्महत्या करीत आहे, असं नवनाथने चिठ्ठित लिहून ठेवलं. दरम्यान, नवनाथच्या आत्महत्येचे वृत्त समजताच परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असतानाच आता त्या मागणीसाठी आत्महत्या करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होत आहे. गेल्या 7 दिवसात 5 मराठा तरुणांनी आपलं जीवन संपवलं आहे. त्यामुळे सर्वत्र खळबळ व्यक्त होत आहे.