पाणी टंचाईमुळं रब्बी हंगामावर संकट; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

पाणी टंचाईमुळं रब्बी हंगामावर संकट; शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरुन जयंत पाटलांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं

Jayant Patil On Cm Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा (Dasara Melava 2023)मेळावा मोठ्या उत्साहात साजरा केला. मुंबईतील (Mumbai)आझाद मैदानात शिवसेना शिंदे गटाचा (Shiv Sena Shinde group)दसरा मेळावा पार पडला. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील(Jayant Patil) यांनी राज्यातील पाणीटंचाई आणि शेतकऱ्यांसमोर उभे राहिलेल्या प्रश्नांवरुन सरकारवर निशाणा साधला आहे. त्यांनी सोशल मीडियावर (Social media)एक पोस्ट शेअर करत शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी केली आहे.

मोठा निर्णय! पाठ्यपुस्तकांमध्ये India ऐवजी लिहलं जाणार भारत, बदलाला NCERT ची मंजूरी

जयंत पाटील यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, सगळे सण धूमधडाक्यात साजरे करत आहात, आता शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात जावी यासाठी पावले उचला, अन्नदात्याची ही आर्त हाक सरकारपर्यंत पोहोचणार का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे.

ऑक्टोबर संपत आला आहे. रब्बी हंगामाची कामे सुरु झाली आहेत. यंदा मात्र पाऊसच कमी झाल्याने रब्बी पिकांवर मोठे संकट आहे. उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र यासह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात पाण्याची तीव्र टंचाई आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने यात तातडीने लक्ष घालून उपाययोजना कराव्यात अशी मागणीही जयंत पाटील यांनी केली आहे.

Girish Mahajan : ‘संजय राऊतांच्या डोक्याचा इलाज करा’; ‘त्या’ वक्तव्यावर महाजनांचा खोचक टोला

सरकारने वेळीच पावलं उचलली नाही तर शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावेल, अशी भीती व्यक्त करत असतानाच अन्नदात्याची ही आर्त हाक सरकारपर्यंत पोहोचणार का? असा सवालही राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उपस्थित केला.

भारतामधील अनेक राज्यांत यंदा अल् निनोमुळे पावसानं दडी मारली, त्यामुळे त्या-त्या राज्यांमध्ये दुष्काळाचे ढग जमा झाल्याचे पाहायला मिळत आहेत. गत महिन्यामध्ये कर्नाटकमधील 195 तालुक्यांध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला, मात्र महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्हे दुष्काळाच्या सावटाखाली आले आहेत. असं असलं तरी त्यावर महाराष्ट्र सरकारकडून अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आली नाही.

महाराष्ट्रातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाळ्याच्या चार महिन्यात सरासरीच्या 40 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे त्या-त्या भागातील शेतकऱ्यांना दुबार, तिबार पेरण्या करुनही त्यांच्या हाती काहीच लागलं नाही, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागला आहे.

या तालुक्यांमधील परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. उल्हासनगर (जि. ठाणे), शिंदखेडा (धुळे), नंदुरबार (नंदुरबार), मालेगाव, सिन्नर, येवला (नाशिक), बारामती, दौंड, इंदापूर, मुळशी, पुरंदर, शिरूर व वेल्हे (पुणे), बार्शी, करमाळा, माढा, माळशिरस व सांगोला (सोलापूर), अंबड, बदनापूर, भोकरदन, जालना व मंठा (जालना), कडेगाव, खानापूर, मिरज, शिराळा (सांगली), खंडाळा व वाई (सातारा), हातकणंगले व गडहिंग्लज (कोल्हापूर), औरंगाबाद व सोयगाव (छत्रपती संभाजीनगर), अंबाजोगाई, धारूर व वडवणी (बीड), रेणापूर (लातूर), लोहारा, धाराशिव व वाशी (धाराशिव), बुलडाणा व लोणार (बुलडाणा) आदी तालुक्यांत पाणी प्रश्न बिकट बनला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube