Sunil Tatkare : सुळेंच्या ‘त्या’ विधानावर सुनिल तटकरे बोलले; ‘दादांसारखा भाऊ..,’

Sunil Tatkare : सुळेंच्या ‘त्या’ विधानावर सुनिल तटकरे बोलले; ‘दादांसारखा भाऊ..,’

Sunil Tatkare : अजितदादांसारखा भाऊ मिळालायं, सुप्रियाताई भाग्यवानच असल्याचं अजित पवार गटाचे(Ajit Pawar Group) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरेंनी(Sunil Tatkare) स्पष्ट केलं आहे. महिला आरक्षण विधेयकावर संसदेत चर्चेदरम्यान, सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी अजित पवार(Ajit Pawar) यांना उद्देशून प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणींचं कल्याण व्हावं असं वाटतं, असं विधान सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांनी केलं होतं. सुळेंच्या या विधानावर तटकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे.

‘त्यांच्याकडून न्यायाची अपेक्षा नाहीच; नार्वेकरांच्या खेळीवर ठाकरेंचे खासदार भडकले

सुनिल तटकरे म्हणाले, 2009,2014, आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांना अजित पवार यांचं भरीव योगदान मिळालं असल्याचं सुप्रियाताई जाहीर सभेत सांगत असतात, त्यामुळे अजितदादांसारखा भाऊ मिळाला आहे, सुप्रियाताई भाग्यवानच असल्याचं तटकरे म्हणाले आहेत.

मिलन लुथरियाच्या ‘Sultan of Delhi’च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चेला उधाण

तसेच महिला आरक्षण विधेयकावर चर्चेदरम्यान, सुप्रिया सुळे भावाबद्दल जे काही बोलल्या आहेत ते अजित पवार यांना उद्देशून बोलणं अभिप्रेत नसावं, असंही तटकरेंनी स्पष्ट केलं आहे.

Asian Games 2023 : टीम इंडियाच! मलेशियाला पराभवाची धूळ चारत सेमी फायनलमध्ये धडक

काय म्हणाल्या सुळे?
महिलांच्या हिताचा विचार भावांनी करावा, हे बरोबर आहे. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात, ज्यांना बहिणीचे कल्याण व्हावे असे वाटते. प्रत्येकाचे एवढे चांगले नशीब नसते, असं सुळे महिला विधेयकावर संसदेत बोलताना म्हणाल्या आहेत. यावेळी बोलताना सुळे यांनी अजित पवार यांनाच नाव न घेता टोला लगावला असल्याचं पाहायला मिळालं. तसेच महाराष्ट्र भाजपचे माजी अध्यक्षांवर थेट आरोप करीत या विधेयकावरुन सत्ताधारी पक्षाला सुळेंनी घेरल्याचं पाहायला मिळालं आहे. यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या विधानाचा दाखला दिला आहे. सुळे म्हणाल्या चंद्रकांत पाटील यांनी मला घरी जाऊन जेवण बनव, असा सल्ला दिला असल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, महिला आरक्षण विधेयकावर केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी आपली भूमिका केली. यावेळी ते म्हणाले, फक्त महिलांनीच महिलांबाबत बोलावं, असं काही नसतं भावांनादेखील बहिणींची काळजी असतेच, असं अमित शाह म्हणाले होते, त्यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube