मिलन लुथरियाच्या ‘Sultan of Delhi’च्या टीझरने सोशल मीडियावर चर्चेला उधाण
Sultan of Delhi: ‘द डर्टी पिक्चर’ (The Dirty Picture) आणि ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ यासारख्या बॉलीवूडच्या (Bollywood) हिट चित्रपटाचे दिग्दर्शक मिलन लुथरिया (Milan Luthria) पुन्हा एकदा आपल्या दिग्दर्शनाची जादू दाखवण्यासाठी सज्ज झाला आहे. आगामी प्रोजेक्ट ‘सुलतान ऑफ दिल्ली’ (Sultan of Delhi) च्या टीझरने सर्वांचे लक्ष वेधून घेतल आहे.
या टीझरच्या सोशल मीडियावर (Social media) चर्चा चांगल्याच रंगल्या आहेत. लुथरिया यांच पहिल्यांदाच ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण असून प्रेक्षक यासाठी खूप मोठ्या प्रमाणात उत्सुक झाल्याचे बघायला मिळत आहे.’सुलतान ऑफ दिल्ली’ या वेब सीरिजच्या टीझरने सध्या सोशल मीडियावर तुफान धुमाकूळ घातला असून प्रेक्षकांमध्ये उत्साह बघायला मिळत आहे. आकर्षक कथा आणि अफलातून सिनेमॅटिक प्रवास ही मिलन लुथरिया यांची ख्याती बनली आहे.
‘सुलतान ऑफ दिल्ली’च्या ट्रेलरची चाहते मोठ्या आतुरतेने वाट बघत आहे. ओटीटीच्या जगात मिलन लुथरियाचा प्रवेश एक सिनेमॅटिक ट्रीट देणार यामध्ये काही शंका नसल्याचे प्रेषक यावेळी म्हणत आहेत.
Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीचा धडाका! ऑस्ट्रेलियन संगीत परिषदेत दाखवली अनोखी कमाल
तसेच डिस्ने प्लस आणि हॉट स्टारने ‘सुलतान ऑफ दिल्ली’ वेब सीरिजचा ट्रेलर रिलीज केला आहे. हा ट्रेलर रिलीज करत असताना कॅप्शनमध्ये लिहिले होते – ‘नशिबाच्या खेळात एकच जिंकेल.’ ही वेब सिरीज १३ ऑक्टोबर दिवशी प्रदर्शित करण्यात येणार आहे. या वेब सीरिजमध्ये मौनी रॉयशिवाय ताहिर राज भसीन, विनय पाठक, निशांत दहिया, अनुप्रिया गोएंका आणि हरलीन सेठी हे कलाकार बघायला मिळणार आहेत.