Rockstar DSP: रॉकस्टार डीएसपीचा धडाका! ऑस्ट्रेलियन संगीत परिषदेत दाखवली अनोखी कमाल
Rockstar DSP: ६९ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात तेलुगु सिनेमाचा बोलबाला ठरला आहे. एकीकडे राम चरण आणि ज्युनियर एनटीआरच्या RRR चित्रपटाने सहा ॲवॉर्ड्स आपल्या नावेकेल्याचे बघायला मिळाले होते. अल्लू अर्जुनच्या पुष्पा: द राईजने २ ॲवॉर्ड्स (Awards) जिंकले. तसेच संगीताची जागतिक पोहोच आणि प्रभाव सातासमुद्रापार आहे.
View this post on Instagram
टोकियो येथे आयोजित ऑस्ट्रेलियन म्युझिक कॉन्फरन्समध्ये (Australian music conference) राष्ट्रीय पुरस्कार विजेते रॉकस्टार डीएसपीच्या (Rockstar DSP) संगीताने प्रेक्षकांची मन जिंकून घेतली आहे. हा केवळ कलाकारांसाठीच नाही तर जगभरातील संगीत रसिकांसाठीही अभिमानाचा क्षण आहे.
रॉकस्टार DSP च्या प्रसिद्ध आणि नवीन रचनांनी त्याला जपानमध्ये संगीताची एक अनोखी ओळख मिळाली आहे. त्याच संगीत टोकियो येथील ऑस्ट्रेलियन संगीत परिषदेत प्रदर्शित केले गेले आहे. हा क्षण रॉकस्टार डीएसपीच्या संगीताद्वारे संस्कृतींना जोडण्याची प्रतिभा नक्कीच उल्लेखनीय ठरला आहे.
रॉकस्टार डीएसपी ग्लोबल फॅनसाठी हा क्षण नक्कीच खास होता. त्याच्या आकर्षक ट्यून आणि फूट-टॅपिंग बीट्ससाठी तो ओळखला जातो. ही एक अनोखी शैली आहे जी पारंपरिक भारतीय संगीताला आधुनिक संगीतासोबत मिसळते. पुष्पा: द रायझिंगचा साउंडट्रॅक प्रचंड यशस्वी झाला, “ओ अंतवा” आणि “श्रीवल्ली” सारखी गाणी झटपट हिट झाली.
Yaariyan 2 Song: दिव्या खोसला कुमारचे ‘यारियां 2’ सिनेमातील नव गाण प्रदर्शित
DSP च्या संगीताने चित्रपटाच्या एकूण आकर्षणात भर घातली आणि तो ब्लॉकबस्टर हिट होण्यास मदत केली. अत्यंत भावूक झालेल्या या संगीतकाराने सांगितले, “पुष्पाला हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळणे हा खूप मोठा सन्मान आहे. या चित्रपटासाठी संगीत तयार करणे हा आव्हाने आणि पुरस्कारांचा प्रवास होता. पुष्पा 2: द रुल, कंगुवा आणि विकास बहल दिग्दर्शित अजय देवगण आणि आर. माधवन यांच्या आगामी सिनेमाची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.