बाळासाहेबांचं निधन झाल्यानंतर, बॉडी ठेवून हाताचे ठसे घेतले! रामदास कदम यांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Ramdas Kadam Allegations On Uddhav Thackeray

Ramdas Kadam Allegations On Uddhav Thackeray : शिंदे गटाचे वरिष्ठ नेते रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांच्यानुसार, उद्धव ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेण्याचा हक्क नाही. बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतरही दोन दिवस उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मृतदेह मातोश्रीवर ठेवला, अशी माहिती त्यांनी दिली.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा (Balasaheb Thackeray) मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला होता? त्यांच्या हाताचे ठसे घेण्यात आले. हे हाताचे ठसे कशासाठी घेतले होते? बाळासाहेब ठाकरे यांचे मृत्यूपत्र कधी करण्यात आले, त्यावर कोणाची सही होती, काढा सगळी माहिती. – रामदास कदम, ज्येष्ठ नेते, शिवसेना

बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले गेले?

कदम यांनी सांगितले की, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर का ठेवला? आम्ही मातोश्रीच्या खाली बसलो होतो आणि मी आठ दिवस बाकावर झोपलो होतो. सगळं कळत होतं, पण हे सगळं कशासाठी केलं जात (Ramdas Kadam Allegations) होतं? बाळासाहेबांच्या हाताचे ठसे का घेतले गेले, मृत्यूपत्रावर कोणाची सही होती, याबाबत डॉक्टरांकडून विचारावे,” असे त्यांनी म्हटले.

बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली

रामदास कदम यांनी आरोप केला की उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा हव्यास होता आणि त्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यांनी काँग्रेससोबत जाऊन शिवसेना सोनिया गांधी यांच्या पायाखाली बांधण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या या कृतीमुळे संपूर्ण शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला, असे कदमांनी नमूद केले.

मुख्यमंत्रिपदाचा हव्यास

कदमांनी पुढे म्हटले की, “आज सर्व शिवसैनिक एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे आहेत. उद्धव ठाकरे यामुळे मराठी माणूस मुंबईबाहेर झाला. त्यांनी 30 वर्षे फक्त टक्क्यांच्या राजकारणात गुंतवणूक केली. महापौर आमचा असला तरी तिथे जाण्याचा अधिकार आम्हाला नव्हता,” असे त्यांनी स्पष्ट केले.

follow us