Manoj Jarange यांनी पाणी तरी प्राशन करावं; संभाजीराजे पोहचले आंतरवाली सराटीत

Manoj Jarange यांनी पाणी तरी प्राशन करावं; संभाजीराजे पोहचले आंतरवाली सराटीत

Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाची घोषणा केली आहे. सरकारला मुदत देऊनही काहीच झाले नसल्याने त्यांनी यावेळी आता आरक्षण मिळेपर्यंत ना अन्, ना पाणी ना वैद्यकीय उपचार अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. यावेळी त्यांना भेटण्यासाठी संभाजीराजे छत्रपती आंतरवाली सराटीमध्ये पोहचले होते. त्यांनी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती?

आम्ही देखील मराठा आरक्षणासाठी लढा दिला आहे. तसेच मी स्वतः आमरण उपोषण केलं आहे. त्यामुळे मला माहित आहे. आमरण उपोषण काय असतं ते. राज घराणं असो किंवा सामान्य लोक शरीर तर सारखचं आहे. मला तुमच्या तब्येची काळजी आहे. त्यामुळे तुम्ही पाणी तरी प्राशन करावं. त्याने गेल्या कित्येक वर्षांपासून समाजासाठी उपोषण केलं आहे.

INDIA Alliance : ‘इंडिया’ आघाडीचं जागावाटप कधी? खर्गेंनी थेट सांगूनच टाकलं

त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशज म्हणून मी त्यांना ताकद देण्यासाठी आलो आहे. गेल्यावेळी लाठीचार्ज झाला तेव्हा देखील मी आलो होतो. कारण समाजासाठी कष्ट करणाऱ्यांना बळ देणं ही माझी जबाबदारी आहे. असं म्हणत संभाजीराजेंनी यावेळी मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

Tiger 3: भाईजान अन् कतरिनाचा जलवा; टायगर 3 मधील गाण्याला प्रेक्षकांची तुफान पसंती

दरम्यान मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 40 दिवसांची मुदत दिली होती. ही मुदत काल (24 ऑक्टोबर) संपली. यावेळी जरांगे पाटील म्हणाले, आधी 17 दिवसांचे उपोषण केले, त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अन्य नेत्यांच्या विनंतीनंतर त्यांच्या शब्दानंतर आपण 40 दिवसांची मुदत दिली. पण या काळात त्यांनी आरक्षण दिले नाही. आम्ही त्यांच्या शब्दाचा मान ठेवला, मग आमचं काय चुकलं? आमच्या मुलांची आयुष्य उद्ध्वस्त होत आहेत. विदर्भातील शेतकऱ्यांना आरक्षण आहे, पण आम्हालाच आरक्षणापासून डावललं जात आहे, असा आरोप त्यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube