PM Modi Birthday : 11 वर्षातील 11 मोठ्या गोष्टी, ज्याने बदलला देशाचा चेहरामोहरा
उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यासारख्या मोठ्या राज्यांनी गरिबी कमी करण्यात सर्वाधिक योगदान दिले आहे.

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि. १७) त्यांचा ७५ वा वाढदिवस साजरा करत आहेत. मोदी पंतप्रधानपदावर विराजमान झाल्यापासून 11 वर्षांत पक्षालाच नव्हे तर, देशाच्या अर्थव्यवस्थेलादेखील एका नव्या उंचीवर नेले आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त (Narendra Modi) गेल्या 11 वर्षात केलेल्या 11 मोठ्या गोष्टींबद्दल जाणून घेऊया ज्यामुळे देशाचा चेहरामोहरा बदलला. गेल्या 11 वर्षात मोदी सरकराने (Modi Government Scheme) असंख्य योजना राबवल्या, ज्याचा परिणाम सामान्य लोकांना आणि संपूर्ण व्यवस्थेला जाणवला. बँकिंगपासून आरोग्यसेवेपर्यंत, घरबांधणीपासून रोजगारापर्यंत आणि डिजिटल इंडियापासून रेल्वेपर्यंत, प्रत्येक क्षेत्रात व्यापक काम करण्यात आले.
मोदींचा वाढदिवस म्हणजे काळादिवस; प्रणिती शिंदेंची जीभ घसरताच भाजपनं घेतलं फैलावर
1. जन धन योजना
सर्वप्रथम, मोदी सरकारने जन धन योजना सुरू केली. प्रत्येक गरीब कुटुंबाला बँकिंग सेवा प्रदान करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत ही योजना सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत 50 कोटींहून अधिक लोकांसाठी बँक खाती उघडण्यात आली. पूर्वी, ज्या लोकांचा बँकांशी संबंध नव्हता ते आता थेट बँकिंग व्यवस्थेशी जोडले गेले आहेत. ही योजना आर्थिक समावेशनाच्या दिशेने एक मोठे पाऊल ठरली.
2. स्वच्छ भारत मोहीम
2014 मध्ये सुरू झालेले स्वच्छ भारत अभियान केवळ एक योजना न राहता एक जनआंदोलन बनले. खेड्यांपासून ते शहरांपर्यंत करोडो देशवासी या मोहिमेत सहभागी झाले. या योजनेमुळे उघड्यावर शौचास जाणाऱ्यांची संख्या लक्षणियरित्या कमी कमी झाली. स्वच्छ पिण्याच्या पाण्याची उपलब्धता वाढली. स्वच्छतेला आरोग्य आणि प्रतिष्ठेशी जोडण्याचा हा प्रयत्न ऐतिहासिक होता.
3. आयुष्मान भारत योजना
आयुष्मान भारत योजना ही जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत, 50 कोटींहून अधिक लोकांना 5 लाख रुपयांपर्यंतचे मोफत उपचार देण्यात आले आहेत. या योजनेमुळे गरीब कुटुंबांना आर्थिक भार कमी झाला आहे आणि गंभीर आजारांवर उपचार करणे शक्य झाले आहे.
4. जीएसटीची अंमलबजावणी
भारताची गुंतागुंतीची करप्रणाली सोपी करण्यासाठी 2017 मध्ये वस्तू आणि सेवा कर (GST) लागू करण्यात आला. पूर्वी वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे कर दर होते, परंतु GST मुळे संपूर्ण देशात एकच करप्रणाली लागू करण्यात आली. व्यवसाय आणि उद्योगासाठी ही एक मोठी सुधारणा मानण्यात आली.
5.पंतप्रधान आवास योजना
मोदी सरकारने 2015 मध्ये प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत 4 कोटींहून अधिक घरे बांधण्यात आली. या योजनेचे उद्दिष्ट गरीब, मजूर आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना कायमस्वरूपी घरे उपलब्ध करून देणे हे होते.
6. उज्ज्वला योजना
ग्रामीण भागात, महिला अजूनही लाकूड आणि शेणाच्या चुलीवर स्वयंपाक करतात, ज्याचे आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होत होते. यावर उपाय म्हणून, सरकारने उज्ज्वला योजना सुरू केली. या योजनेंतर्गत 10 कोटींहून अधिक कुटुंबांना मोफत एलपीजी गॅस कनेक्शन देण्यात आले. यामुळे प्रदूषण आणि आरोग्य समस्या कमी झाल्या.
7. मेक इन इंडिया
भारताला उत्पादन हबमध्ये रूपांतरित करण्यासाठी 2014 मध्ये मेक इन इंडिया मोहीम सुरू करण्यात आली. या मोहिमेमुळे केवळ परदेशी गुंतवणूक आकर्षित झाली नाही तर, देशांतर्गत उद्योगांनाही बळकटी मिळाली. रोजगाराच्या संधी वाढल्या आणि जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मजबूत झाली.
8. डिजिटल इंडिया
2015 मध्ये सुरू झालेल्या डिजिटल इंडिया उपक्रमाने देशाला डिजिटल युगात प्रवेश दिला. इंटरनेट कनेक्टिव्हिटी वाढवली गेली, ऑनलाइन सेवा सोप्या झाल्या आणि डिजिटल साक्षरतेला चालना देण्यात आली. आज, बँकिंगपासून सरकारी योजनांपर्यंत प्रत्येक सेवा लोकांच्या मोबाईल फोनवर उपलब्ध आहे.
तुम्ही ब्रँड नाहीत, नरेंद्र मोदीच जगातला सर्वात मोठा ब्रँड; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना डिवचलं…
9. पंतप्रधान किसान सन्मान निधी
शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत देण्यासाठी सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली. या योजनेअंतर्गत, 12 कोटींहून अधिक शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची मदत दिली जाते. यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत झाली आहे.
10. नमामि गंगे प्रकल्प
नमामि गंगे प्रकल्प हा मोदी सरकारचा एक प्रमुख पर्यावरणीय उपक्रम होता. या प्रकल्पात गंगा नदी आणि तिच्या उपनद्यांच्या स्वच्छतेसाठी आणि संवर्धनासाठी व्यापक काम समाविष्ट करण्यात आले.
11. भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण
मोदी सरकारने रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. स्थानकांचे नूतनीकरण, नवीन गाड्या सुरू करणे आणि हाय-स्पीड रेल्वे प्रकल्प हे या दिशेने महत्त्वाचे उपक्रम आहेत. यामुळे प्रवाशांना चांगला आणि सुरक्षित प्रवास मिळाला आहे.
VIDEO: नरेंद्र मोदी ते अजित पवार, लेट्सअपच्या Exclusive Interview मध्ये काय म्हणाले शरद पवार?
11 वर्षांत 27 दशलक्ष नागरिक गरिबीतून बाहेर
जागतिक बँकेच्या अहवालानुसार, गेल्या 11 वर्षांत भारताने गरिबी कमी करण्यात प्रचंड यश मिळवले आहे. 2011-12 मध्ये, देशातील सुमारे 27 टक्के लोकसंख्या अत्यंत गरीब होती, जी आता फक्त 5.3 टक्के झाली आहे. याचा अर्थ असा की, अंदाजे 27 दशलक्ष लोक गरिबीतून बाहेर पडले आहेत.
जागतिक बँकेने असेही म्हटले आहे की, दररोज 3 डॉलर्सच्या दारिद्र्यरेषेवर आधारित, गरिबांची संख्या 34.4 दशलक्ष वरून अंदाजे 7.5 दशलक्ष झाली आहे. दररोज 2.15 डॉलर्सच्या जुन्या मानकानुसार, ही संख्या आणखी कमी आहे. 2011-12 मध्ये देशातील सर्वात गरीब लोकसंख्येच्या 65 टक्के लोकसंख्या असलेल्या उत्तर प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेश यासारख्या मोठ्या राज्यांनी गरिबी कमी करण्यात सर्वाधिक योगदान दिले आहे.