VIDEO : पुणे मेट्रो मोदींमुळेच सुस्साट धावली; अजितदादांना मोदींच्या कार्यक्षमतेवर विश्वास नाही का? मोहोळ थेट बोलले…
Murlidhar Mohol : 2014 साली जेव्हा मोदींचे सरकार सत्तेत आले त्यावेळी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या. भूमिपूजनाचा नारळ मोदींनी फोडला.
Murlidhar Mohol On Ajit Pawar: नरेंद्र मोदी सरकार सत्तेत आले आणि पुणे शहरात धावणाऱ्या मेट्रोला अधिक गती मिळाली असा दावा केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांनी लेट्सअप मराठीशी बोलताना व्यक्त केला आहे. शहरातील धावणारी मेट्रो माजी दिवंगत पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात मंजूर झाली असे विधान करणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनाही मोहोळ यांनी उत्तर दिले.
अजितदादांना मोदींच्या कार्यक्षमतेवर विश्वास नाही का?
पुण्यात धावणारी मेट्रो ही भाजप सरकारच्या काळात सुस्साट धावल्याचा दावा भाजपकडून केला जातोय. पण, याच मेट्रोला दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या कार्यकाळात मंजुरी मिळाल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सांगतात. त्यावर मोहोळ म्हणाले की, जर, मनमोहनसिंग यांनी पुण्याची मेट्रो केली असेल तर, दादांना मोदींच्या नेतृत्वावर त्यांच्या कामावार आणि त्यांच्या कर्तृत्वावर तुमचा विश्वास नाही का? असा थेट सवाल मोहोळ यांनी केला.
VIDEO : उंटावरून शेळ्या हाकू नको; आमदार महेश लांडगेंचे अजितदादांना जोरदार प्रत्युत्तर
2001 ते 2014 च्या काळात देशाचे पंतप्रधान मनमोहनसिंग होते. तर, पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते. मात्र, कागदावरची मेट्रो कागदावरच होती. या कामाला वेग आणण्यासाठी सत्तेत मोदींनी यावे लागले. 2014 साली जेव्हा मोदींचे सरकार सत्तेत आले त्यावेळी सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या आणि भूमिपूजनाचा नारळ मोदींनी फोडला आणि पुणे मेट्रो सुरू झाली. दररोज दोन लाख पुणेकर मेट्रोने प्रवास करतात त्यांना विचारा मनमोहनसिंग की मोदीजी याचे उत्तर पुणेकर अचूक देतील असे मोहोळ म्हणाले. येत्या 15 जानेवारी रोजी महानगरपालिकांसाठी मतदान केले जाणार आहे. गेल्या 5 वर्षात झालेला विकास आणि मोदीं यांच्या सरकारमधील पुण्यासाठीचे योगदान हे मोठं आहे. पुणेकर सुज्ञ आणि जाणकार आहेत. त्यामुळे येथील मतदार विचाराला, विकासाला आणि भविष्याला मत देतात यावेळेसही मतदार आम्हालाच मतदान करून पुन्हा एकदा भाजपचाच महापौर करतील याचा पूर्ण विश्वासही मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केला.
मराठी माणूस मुंबईतून हद्दपार कोणी केला ? फक्त राजकीय वापरच ?
नेत्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी दिलेली नाही
यंदाच्या निवडणुकीत भाजपमधील नेत्यांच्या इच्छूक उमेदवारांना उमेदवारी दिलेली नसून कार्यकर्त्यांना तिकीटं दिलेली आहेत. पण, मोदींच्या विचारांवर आणि फडणवीसांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवणाऱ्या आणि आमच्यासोबत काम करणाऱ्यांना आम्ही प्रवेश दिल्याचे सांगत बाहेरून आलेल्या सुरेंद्र पठारेंसह अन्य उमेदवारांना तिकीच देण्यात आले आहे. प्रवेशावेळी पठारेंना आम्ही तिकीटाचा कोणताही शब्द दिला नसल्याचेही यावेळी मोहोळ यांनी स्पष्ट केले. मात्र, पक्षात प्रवेश केल्यानंतर जे मेरिट पाहिलं जातं तसेच सर्व्हेमध्ये जी नावं आली त्यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आल्याचे ते म्हणाले.
बिनविरोध निवडणुकांबाबत विचार व्हायला हवा
नगरसेवक बिनविरोध निवडून येणे, हा चांगला पायंडा आहे असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते. मात्र, जर, अशाप्रकारे उमेदवार बिनविरोध निवडून येत असतील तर, त्या प्रभागातील मतदारांचा मतदानाचा हक्का हिरावाल जातोय असे चित्र निर्माण होतयं यावर बोलताना मोहोळ म्हणाले की, लोकशाहीत याबाबतीत नक्कीच विचार केला पाहिजे. पण, आता जिथे उमेदवारचं नाही तिथे निवडणूक होणार नाही. आता जे प्रचलित नियम आणि कायदा आहे त्यानुसार ती बिनविरोध झालेली निवडणूक आहे. परंतु भविष्यात याबाबत विचार करायला हरकत नाही.
कार्यकर्त्यांना नक्कीच संधी मिळणार
ज्या प्रभागांमध्ये उमेदवारांनी माघार घेतली आहे. तेथे त्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक म्हणून शब्द देण्यात आला आहे. पण अशा किती जणांना संधी दिली जाणार यावर मोहोळ म्हणाले की, भाजप हा मोठा पक्ष आहे. आज आम्ही केंद्रात आणि राज्यात सत्तेत आहोत. महापालिकेतही आम्ही सत्तेत येणार आहोत. त्यामुळे कार्यकर्त्यांना खूप संधी आहे. राज्यातील, केंद्रातील महामंडळे आहेत, पालिकेच्या विविध कमिट्या आहेत, त्यामुळे कार्यकर्त्यांना निश्चित कुठे ना कुठे संधी मिळणार आहे. यावेळी मोहोळ यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकासकामांचाही उल्लेख केला. येत्या काही दिवसातच हिंजवडी मेट्रोही प्रवाशांच्या सेवेत रूजू होईल असेही मोहोळ म्हणाले.
