‘इंडिया आघाडीत कितीही रावण एकत्र आले तरी मोदींचे केसंही..,’; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

‘इंडिया आघाडीत कितीही रावण एकत्र आले तरी मोदींचे केसंही..,’; CM शिंदेंची तुफान फटकेबाजी

Cm Eknath Shinde : इंडिया आघाडीत कितीही रावण एकत्र आले तरीही मोदींचे केसंही वाकडे करु शकत नसल्याचं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Cm Eknath Shinde) यांनी तुफान फटकेबाजी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी(Pm Narendra Modi) आज अहमदनगरमधील शिर्डी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान मोदींच्या हस्ते निळवंडे धरणातील पाण्याच्या जलपूजनासह डाव्या कालव्याचं उद्घाटन करण्याता आलं आहे. मोदींच्या दौऱ्यानिमित्त शिर्डीत आयोजित सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.

ललित पाटीलचा ‘एक्झिट प्लॅन’ यशस्वी करणाऱ्या दोघांना अटक : पुणे पोलिसांची मोठी कारवाई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना करण्यात आली आहे. मात्र, इंडिया आघाडीत कितीही रावण एकत्र आले तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदींचे केसंही वाकडे करु शकत नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. देशभरात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2 लाख कोटी रुपयांची कामे सुरु आहेत. देशात आता विकासकामांनी वेग धरला असल्याचंही मुख्यमंत्री शिंदेंनी स्पष्ट केलं.

‘मी मराठा आरक्षणासाठी जीव देत आहे’, चिठ्ठी लिहून 23 वर्षीय तरुणानं संपवलं जीवन

इंडिया आघाडीच्या माध्यमातून अनेक नेते एकत्र आले आहेत. याआधीही 2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदींना हरवण्यासाठी विरोधकांकडून अनेकदा प्रयत्न झाले आहेत. पण विरोधक मोदींना हरवू शकलेले नाहीत. आता 2024 साली देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान होणार असल्याचा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे.

मोठी बातमी! अमेरिकेत अंदाधुंद गोळीबार, 22 ठार तर 60 जण जखमी

राज्यात मागील अडीच वर्षांपासून अनेक विकासकामे थांबली होती. मागील अडीच राज्यातील विकासकामे थांबलेली होती. त्यासाठीच राज्यात डबल इंजिनचं सरकार स्थापन झालं. विकासकामे खोळंबल्यानेच बंड करुन भाजपसोबत सत्ता स्थापन केली असल्याचंही शिंदे म्हणाले आहेत.

सरकारी भाषा अन् आश्वासनांचा पाऊस : महाजनांसोबतचा संवाद जरांगे पाटलांनी महाराष्ट्राला ऐकवला

आता मोदींच्या नेतृत्वात आम्ही अनेक विकासकामांचं लोकार्पण केलं आहे. त्यामुळे अनेकांच्या पोटात दुखतंय. त्यांच्या पोटात दुखत असेल तर दुखू द्या, पोटात दुखणाऱ्यांसाठी आम्ही ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरु केला असल्याची खोचक टीकाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज