Maratha Reservation : गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड; मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

Maratha Reservation : गुणरत्न सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड; मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीचे (Maratha Reservation) आंदोलन राज्यात पुन्हा वाढत चालले आहे. आता मुंबईत मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणाला विरोध करणारे वकिल गुणरत्न सदावर्ते  (Gunaratna Sadavarte) यांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी एक मराठा, लाख मराठा अशा घोषणाही दिल्या. मुंबईतील क्रिस्टल टॉवर परिसरात आज पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणात मुंबई पोलिसांनी तिघा जणांना अटक केली आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल पोलिसांकडून गुन्हाही दाखल होऊ शकतो.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील आंतरवाली सराटीत उपोषणाला बसले होते. त्यावेळी सदावर्ते यांनी आरक्षणाला विरोध करत जरांगे पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावरुनच ही आज सदावर्तेंच्या वाहनांची तोडफोड करण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. काही जण हातात काठ्या घेऊन वाहनांची तोडफोड करताना दिसले. वाहनांच्या काचा फोडण्यात आल्या. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत काही जणांना ताब्यात घेतलं. भोईवाडा पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.

‘मराठा आरक्षणाचा निर्णय अंतिम टप्प्यात पण..,’; शंभूराज देसाईंचं सूचक विधान

मराठा आरक्षणाला विरोध केल्यामुळे गुणरत्न सदावर्ते यांच्यावर हल्ला होऊ शकतो अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर सदावर्ते यांच्या संरक्षणासाठी दहा ते बारा पोलीस तैनात करण्यात आले होते. सदावर्ते यांनी याआधीही मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केला होता. तशी विधानेही केली होती. सरकारने ज्यावेळी मराठा आरक्षणाला मंजुरी दिली होती त्यावेळी सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलं होतं. त्यावेळीही सदावर्ते यांच्यावर प्रचंड टीका झाली होती.

शिंदे-फडणवीसांचा दिल्ली दौरा 

दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलेल्या मुदतीत सरकारने आरक्षणाचा निर्णय घेतला नाही. त्यामुळे जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यावेळी त्यांनी अन्न आणि उपचार घेणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सरकारची धावपळ उडाली आहे. मराठा समाजाला आरक्षण देणारच. त्यासाठी सरकारला आणखी थोडा वेळ द्या अशी मागणी सत्ताधारी गटाकडून केली जात आहे. मात्र जरांगे पाटील आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. या घडामोडींनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देंवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली गाठली आहे. त्यांचा हा दिल्ली दौरा नेमका कशासाठी होता याचा तपशील अद्याप समोर आलेला नाही. 

Maratha Reservation : ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण देता येणार; हरिभाऊ राठोडांचा दावा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज