Maratha Reservation : ओबीसीला धक्का न लावता मराठा आरक्षण देता येणार; हरिभाऊ राठोडांचा दावा
Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation ) आमरण उपोषण केल्यानंतर जरांगे पाटलांनी सरकारला 40 दिवसांचा अल्टिमेटम दिला होता. हा अल्टिमेटम संपल्यानंतर जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा आमरण उपोषणाचं हत्यार उपसलं आहे. त्यामध्ये आता ओबीसींना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल याचा फॉर्मुला माझ्याकडे असल्याचा दावा आरक्षण विश्लेषक हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.
मराठा आरक्षणाचा फॉर्मुला माझ्याकडे…
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला असताना त्यात अनेक राजकीय पक्ष उड्या घेत आहेत. त्यात नुकताच केसीआर यांच्या बीआरएसमध्ये प्रवेश केलेले माजी खासदार आणि आरक्षण विश्लेषक यांनी देखील नवा दावा केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ओबीसींना धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण कसं देता येईल? याचा फॉर्मुला माझ्याकडे असल्याचा दावा आरक्षण विश्लेषक हरिभाऊ राठोड यांनी केला आहे.
Sanjay Raut यांच्या बोलण्याला आम्ही काही महत्व देत नाही; गुलाबराव पाटलांचा टोला
ते म्हणाले की, ओबीसीमध्ये सब कॅडरेशन केलं तर मराठ्यांना आरक्षण देता येऊ शकेल, अशी प्रतिक्रिया हरिभाऊ राठोड यांनी दिली आहे. यासाठी त्यांनी मंडळ आयोगाचा दाखला दिला आहे. त्यामुळे त्यांच्या या दाव्याने आता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यामध्ये आणखी एक फॉर्मुला चर्चेला येणार आहे. दरम्यान मराठा आरक्षणासाठी जरांगेंनी उपोषण सुरु करताच आज मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले आहेत.